पानेगांव ( वार्ताहर)- नेवासा तालुक्यातील लोकप्रतिनिधी या नात्याने शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदारकी पणाला माजी मंत्री आमदार शंकरर...
पानेगांव ( वार्ताहर)-
नेवासा तालुक्यातील लोकप्रतिनिधी या नात्याने शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदारकी पणाला माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख पाटील पानेगांव (ता नेवासा) येथील मुळा नदी बंधारे जलपूजन, विविध विकास कामांचा शुभारंभ तसेच नूतन ग्रामपंचायत कार्यालय लोकार्पण कार्यक्रमात गडाख बोलतं होते.
अध्यक्षस्थानी मुळा कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर हे होते.
दिवसेंदिवस पाऊसाचे प्रमाण कमी होत चालले असून शेती तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.परंतु शासनावर दबाव टाकून तीव्र स्वरूपाचे आंदोलन शेतकऱ्यांना बरोबर घेऊन केल्याने अधिकाऱ्यांचा लेखी आश्वासन मुळे आज मुळा तसेच प्रवरेचे बंधारे पूर्ण क्षमतेने भरले. शेतकऱ्यांचा चेहऱ्यावरील आनंद बघून समाधान व्यक्त करुन सध्या सरकारच्या नाकर्तेपणा सर्वच शेती मालाचे भाव पडले असून सत्ताधाऱ्यांनकडून शेतकऱ्यांना देशोधडीला लावले जात आहे.
दूध,कांदा, सोयाबीन पडलेले भाव आणि आता केंद्र सरकारने इथेनॉल निर्मिती बंद करण्याचा घेतलेला घातकी निर्णयाने शेतकऱ्यांन बरोबरच कारखानदारी संकटात सापडली आहे.
भविष्यात पाण्यासाठी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याची वेळ येणार असून लोकप्रतिनिधी या नात्याने आमदार कि पणाला लावू असा विश्वास करुन ज्या पद्धतीने जेष्ठ नेते यशवंतराव गडाख पाटील मुळाथडी परीसर ठाम उभा राहिला त्याच पद्धतीने येत्या काळात हि ठाम उभे रहा असे गडाख यांनी म्हटले.
मुळाचे संचालक संजय जंगले यांनी आपल्या भाषणात सांगितले की,मुळाथडी परीसरात माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख पाटील यांचा मार्गदर्शनाखाली सुनिल गडाख यांनी दिलेल्या भरघोस निधी मुळे काया पलट झाला असून पानेगांवात शिवस्मारक मुळे जिल्ह्यात नवी ओळख निर्माण झाली. दरवर्षी या हि वेळी बंधारे पूर्ण क्षमतेने भरले असून आमदार शंकरराव गडाख पाटील यांचे आभार व्यक्त केले. यावेळी
प्रा.दादासाहेब जाधव, दग्गूभाई हवालदार सुभाष टेमक मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमासाठी पानेगांवचे लोकनियुक्त सरपंच सौ निकीता आंबेकर, उपसरपंच दत्तात्रय घोलप बबनराव जंगले रामराजे जंगले हौशाबापू जंगले, ज्ञानेश्वर जंगले, शिवसेना महिला आघाडीच्या सौ.दिपाली नवगिरे सौ.रुपाली गुडधे मुळाचे संचालक रंगनाथ जंगले, किशोर जंगले, सुभाष गुडधे,शिरेगांवचे सरपंच निरंजन तुवर, उपसरपंच भगिरथ जाधव, सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ रमेश जाधव, परमानंद जाधव, विठ्ठल जाधव,दग्गूभाई हवालदार,करजगांवचे उपसरपंच सतिश फुलसौंदर, सुभाष टेमक अंमळनेर सरपंच ज्ञानेश्वर आयनर, अच्युत घावटे, चंद्रकांत माकोणे,निंभारीचे सरपंच आप्पासाहेब जाधव,काका जाधव, रमेश गुडधे ,निवृती जंगले, सुनिल चिंधे, उद्धव चिंधे सुरेंद्र जंगले भाऊसाहेब काकडे रघूनाथ जंगले,वाटापूरचे रावसाहेब कदम , भिकाजी जगताप, पांडुरंग माकोणे , दिगंबर जाधव,गोवर्धन आयनर, दत्तात्रय माकोडे,केशव औटी,सोपान औटी,मुळाचे संचालक सोपान पंडित, निलेश पाटील पत्रकार संघटनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब पाटील आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते
प्रस्ताविक माजी लोकनियुक्त सरपंच संजय जंगले यांनी केले सुत्रसंचालन संदिप जंगले आभार ग्रामविकास अधिकारी गणेश पाखरे यांनी मानले.
मुळाथडी परीसरातील सर्वच गावाला सुनिल गडाख यांनी दिलेल्या निधीमुळे गावांचा झालेला विकास झाला असून मोठ्या प्रमाणात बदल दिसून आला असल्याने आमदार गडाख यांनी आनंद व्यक्त केला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत