राहुरीचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांची अहमदनगर कंट्रोलला बदली - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरीचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांची अहमदनगर कंट्रोलला बदली

  राहुरी वेबटीम:- राहुरीचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांची अहमदनगर कंट्रोलला बदली करण्यात आली असून उंबरे येथील राष्ट्रीय बाल हक्क आयोगाला चौ...

 राहुरी वेबटीम:-


राहुरीचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांची अहमदनगर कंट्रोलला बदली करण्यात आली असून उंबरे येथील राष्ट्रीय बाल हक्क आयोगाला चौकशीसाठी पोलीस निरीक्षक जाधव यांची तात्पुरते स्वरूपात अहमदनगर नियंत्रण कक्षात बदली केली आहे.

उंबरे येथील गुन्हयाच्या अनुषंगाने पोलीसांच्या भुमीकेबाबत राष्ट्रीय बाल अधिकार, संरक्षण आयोगाने नाराजी व्यक्त केली असून त्याबाबत आयोगाकडून चौकशी सुरु करण्यात आली आहे. चौकशी प्रक्रीया सुरु असल्याने पोलीस निरिक्षक धनंजय जाधव प्रभारी अधिकारी राहुरी पोलीस स्टेशन यांना तेथे कार्यरत ठेवणे न्यायोचित होणार नसल्याने विशेष पोलीस निरिक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक यांचेकडील संदर्भ क्र.४ अन्वये पोलीस निरिक्षक धनंजय अनंतराव जाधव यांची पुढील आदेश होईपावेतो, तात्पुरत्या स्वरुपात पोलीस नियंत्रणकक्ष अहमदनगर येथे नेमणुक करण्यात आली आहे.

दरम्यान गेल्या अनेक वर्षापासून राहुरी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक आपला कालावधी पूर्ण न करता वेगवेगळ्या चौकशीत गुंतूले जात असल्याने बदली होत आहे

पोलीस निरीक्षक जाधव यांनी सामान्य नागरिकांच्या अडचणी समजून  त्यांच्याशी सुसंवाद साधत आपली वेगळी छाप पाडली होती.सामान्य नागरिकांना पोलीस निरीक्षक जाधव आपल्यातील अधिकारी वाटत होते.पोलीस ठाण्यात जास्त काळ नागरिकांचे प्रश्न सोडवून कर्मचाऱ्यांत सुसूत्रता आणण्यात ते यशस्वी ठरले होते.


अनेक गुन्ह्याचा तपास योग्य रीतीने करून गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले असताना त्यांची  नगर कंट्रोलला बदली झाल्याने पुन्हा एकदा राहुरीत गुन्हेगारी डोके वर काढणार असल्याचे बोलले जात आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत