राहुरी फॅक्टरी(वेबटीम):- समाजासाठी काम करण्याची धडपड राजे छत्रपती युवा प्रतिष्ठानचे प्रदीप उर्फ पिनू गरड यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांमध्ये...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम):-
समाजासाठी काम करण्याची धडपड राजे छत्रपती युवा प्रतिष्ठानचे प्रदीप उर्फ पिनू गरड यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांमध्ये नेहमीच दिसून आली असून भविष्यातही या प्रतिष्ठानकडून समाजपयोगी काम व्हावेत अशी अपेक्षा प्रेरणा उद्योग समूह तथा शिर्डी संस्थांनचे माजी विश्वस्त सुरेश वाबळे यांनी केले.
माजी नगरसेवक प्रदीप गरड यांच्या वाढदिवसानिमित्त सन्मान करताना मान्यवर(छाया-निलेश भगत)राहुरी फॅक्टरी येथे माजी नगरसेवक प्रदीप गरड यांचा अभिष्टचिंतन सोहळा व राजे छत्रपती युवा प्रतिष्ठानच्या रौप्यमहोत्सव कार्यक्रम बुधवारी सायंकाळी समर्थनगर येथे पार पडला.प्रसंगी श्री.वाबळे कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदावरून बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर साई आदर्श मल्टिस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल भनगडे, आदर्श पतसंस्थेचे चेअरमन विष्णुपंत गीते, शांती चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन, व्यापारी असोसिएशनचे सुनील विश्वासराव, कारभारी खुळे आदी मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित सर्व मान्यवरांनी प्रदीप गरड व राजे छत्रपती युवा प्रतिष्ठानच्या कार्याचा आपल्या मनोगतातून गौरव केला.
यावेळी गणेशोत्सवनिमित्ताने पार पडलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.
या कार्यक्रमास राहुरी फॅक्टरी व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष जयेश मुसमाडे, डॉ.रवींद्र वामन, दत्तात्रय दरंदले, डॉ.भाग्यवान, डॉ.सुनील कदम, डॉ.चोरडिया, सुहास महाजन, बाळासाहेब लोखंडे, पिनू कोबरणे आदिंसह मान्यवर उपस्थित होते. प्रसंगी अजित येवले सर यांनी गीत गायन करून कार्यक्रमात रंगत आणली. सूत्रसंचालन श्रीकांत जाधव यांनी केले तर आभार संतोष झावरे यांनी मानले.
प्रसंगी चैतन्य उद्योग समुहाचे अध्यक्ष गणेश भांड यांनी देखील प्रदिप गरड यांचा सन्मान केला यावेळी शिवसेना अध्यात्मिक आघाडी जिल्हाध्यक्ष संपत काका जाधव,रामभाऊ जगताप आदी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजे छत्रपती युवा प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. यावेळी नागरिक, माता-भगिनी मोठ्या संख्यने उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत