अहमदनगर(वेबटीम) अहमदनगर जिल्हा कलाध्यापक संघाच्या अध्यक्षपदी संत कदम माऊली विद्यालयाचे कलाध्यापक बाळासाहेब पाचरणे यांची तर उपाध्यक्षपदी चं...
अहमदनगर(वेबटीम)
अहमदनगर जिल्हा कलाध्यापक संघाच्या अध्यक्षपदी संत कदम माऊली विद्यालयाचे कलाध्यापक बाळासाहेब पाचरणे यांची तर उपाध्यक्षपदी चंद्रगिरी माध्यमिक विद्यालयाचे कलाध्यापक अनिल जंगले यांचे तर केशव गोविंद विद्यालयाचे कलाध्यापक दत्तात्रय साळवे यांची सचिव पदी निवड करण्यात आली आहे श्री पाचरणे यांना त्यांच्या पदाधिकाऱ्यांसह निवडीचे पत्र महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र बाराइ यांनी दिले आहे.
बाळासाहेब पाचरणे गेल्या वीस वर्षापासून अहमदनगर जिल्हा कलाध्यापक संघाचे सदस्य आहेत यापूर्वी त्यांनी जिल्हा सचिव म्हणून चांगल्या प्रकारे कामकाज पाहिले आहे त्याचबरोबर अनिल जंगले हे देखील वीस वर्षापासून कलाध्यापक संघाची सदस्य आहेत त्यांचे देखील कलाध्यापक संघासाठी मोठे योगदान आहे दत्तात्रय साळवे यांनी राहुरी तालुका कलाध्यापक संघात जबाबदारी सांभाळलेली होती,त्याच बरोबर सहसचिव म्ह्णून अर्जुन करपे व कोषाध्यक्ष पदी पर्वत उऱ्हे यांची निवड करण्यात आली आहे.
महिला आघाडीची जबाबदारी छाया काळे यांचे कडे सोपविण्यात आली आहे बाळासाहेब पाचरणे व पदाधिकाऱ्यांची निवड तीन वर्षासाठी असून पालघर येथे होणाऱ्या कलाशिक्षण परिषदेस मोठ्या संख्येने कलाध्यापक उपस्थित ठेवण्याची जबाबदारी या नवीन पदाधिकारी मंडळावर राहणार आहे.
नवीन पदाधिकाऱ्यांचे राज्याचे माजी अध्यक्ष पी आर पाटील सचिव एम ए कादरी त्याचबरोबर विद्यमान उपाध्यक्ष बलराम सामंत सचिव दिगंबर बेंडाळे सहसचिव प्रकाश पाटील पुणे विभागीय उपाध्यक्ष अशोक काळे सहकार्यवाह दीपक कन्ना यांनी अभिनंदन केले आहे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत