पारनेर प्रतिनिधी : श्रीकांत चौरे सरकारी व निमसरकारी, शिक्षकशिक्षकेत्तर कर्मचारी समन्वयसमिती महाराष्ट्र राज्याने घेतलेल्या निर्णयानुसार मा...
पारनेर प्रतिनिधी : श्रीकांत चौरे
सरकारी व निमसरकारी, शिक्षकशिक्षकेत्तर कर्मचारी समन्वयसमिती महाराष्ट्र राज्याने घेतलेल्या निर्णयानुसार मागण्यांच्या आग्रहासाठी राज्यभरात शासकीय कर्मचारी दिनांक 14 डिसेंबर 2023 पासून बेमुदत संपावर जाणार आशी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून
रितसर नोटीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवली असुन पारनेर तालुक्यातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी पारनेर तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन करत बेमुदत संप सुरु केला आहे .
या बेमुदत संपामध्ये सर्व राजपत्रीत अधिकारी महासंघही एक दिवशीय रजा आंदोलन करत संपात सहभागी झाले आहेत . मार्च २०२३ मध्ये सरकारी कर्मचारी, शिक्षकांनी प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संप आंदोलन छेडले होते. तत्समयी सदर संपात मध्यस्थी करुन संघटना प्रतिनिधींशी चर्चा केली गेली व सदर चर्चेत प्राधान्यक्रमावर असलेली जुनीपेन्शन सर्वांना मंजूर करा या मागणी बाबत लेखी हमी देऊन शासकीय कर्मचार्यांना दिलासा दिला होता. इतर १७ मागण्यांबाबत सत्वरनिर्णय घेतले जातील असेही निसंदिग्ध आश्वासन दिले होते. त्यामुळे शासन स्तरावरील कार्यवाहीपूर्ण होण्यास वेळ मिळावा या उद्देशाने विनंती नुसार कर्मचार्यांनी संप आदोलन संस्थगित केले होते.
राज्याच्या प्रमुखांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता होईल अशी अपेक्षा होती.परंतु गत सहा महिन्यांचा कालावधी उलटून गेल्यावरही कोणत्याही मागणी संदर्भात अंतीम ठोस निर्णय अद्याप होऊ शकला नाही. त्यामुळे सर्वदूर महाराष्ट्रातील कर्मचारी शिक्षक कमालीचे संतप्त झालेले आहेत. हा रोषव्यक्त करण्यासाठी राज्यातील १७ लाखकर्मचारी- शिक्षकांनी दि. १४ डिसेंबर २०२३ पासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्धार पक्का केला आहे.राज्याचे मुख्यमंत्री उपरोक्त घोषित संप आदोलनाबाबत आपुलकीने विचार करून संभाव्य संघर्ष, सर्व प्रलंबित मागण्यांबाबत कर्मचारीभिमुख ठोस निर्णय घेऊन टाळला जाईल, अशी अपेक्षा कर्मचारी वर्गाला आहे.
रास्त प्रलंबित मागण्यांबाबत ठोस निर्णय तत्काळ होऊ शकले नाहीत तर मात्र निर्णयाक संर्घष अटळ आहे. आसे आंदोलकांच्या संतप्त भावना आहेत .या आशयाचे पत्र कर्मचारी संघटनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे .
पारनेर तहसील कार्यालयात सुरू असणाऱ्या या आंदोलनात सर्व शासकीय कर्मचारी संघटनेचे सर्व पदाधिकारी शासकीय अधिकारी व कर्मचारी शिक्षक व शिक्षक इतर कर्मचारी यावेळी या आंदोलनात उपस्थित होते .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत