देवळाली प्रवरातील भालेकर वस्तीवर दत्त मंदिरात गुरुचरित्र पारायण सोहळा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरातील भालेकर वस्तीवर दत्त मंदिरात गुरुचरित्र पारायण सोहळा

देवळाली प्रवरा(वेबटीम) राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील कारखाना-देवळाली मेनरोडवर असलेल्या श्री.दत्त मंदिरात सालाबादप्रमाणे यंदाही श्र...

देवळाली प्रवरा(वेबटीम)



राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील कारखाना-देवळाली मेनरोडवर असलेल्या श्री.दत्त मंदिरात सालाबादप्रमाणे यंदाही श्री.गुरुचरित्र पारायण सोहळा सप्ताह बुधवार दिनांक २० डिसेंबर ते बुधवार २७ डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत.


वै.गुरुवर्य रघुनाथ महाराज उंबरेकर, ब्रम्हलीन सद्गुरू श्रीहरी महाराज भालेकर यांच्या कृपाआशीर्वादाने ह.भ.प बाळकृष्ण महाराज खांदे, ह.भ.प.भास्करराव तांबे,ह.भ.प.रोहिदास महाराज सांगळे यांच्या नेतृत्वाखाली संपन्न होणाऱ्या गुरुचरित्र पारायण सोहळ्यात गुरुचरित्र पारायण, हरिपाठ, भजन, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत.


बुधवार २० डिसेंबर रोजी सुभाष महाराज विधाटे, २१ डिसेंबर रोजी आबा महाराज कोळसे, २२ डिसेंबर रोजी बाबा महाराज मोरे, २३ डिसेंबर रोजी नामदेव महाराज जाधव, २४ डिसेंबर रोजी बाळकृष्ण महाराज खांदे, २५ डिसेंबर रोजी बाबानंद महाराज वीर यांचे प्रवचन संपन्न होणार आहे.


तर शुक्रवार २७ डिसेंबर रोजी भागवत महाराज उंबरेकर यांच्या काल्याच्या किर्तनाने व महाप्रसाद वाटपाने सोहळ्याची सांगता होणार आहे.


 सप्ताहात अन्नदानासाठी समाजातील दानशूर मंडळींचे सहकार्य लाभणार आहे. भजन व प्रवचन सेवेसाठी टाळकरी व वारकरी यांची मदत लागणार आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत