राहुरी फॅक्टरी(प्रतिनिधी) राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल दिनकर गर्जे यांची सहायक पोलिस उपनिरीक्षकपदी पदोन्नती झाल्याबद्दल पोलीस नि...
राहुरी फॅक्टरी(प्रतिनिधी)
राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल दिनकर गर्जे यांची सहायक पोलिस उपनिरीक्षकपदी पदोन्नती झाल्याबद्दल पोलीस निरीक्षक संजय सोनवणे यांनी सन्मान केला आहे. ज्ञानदेव गर्जे हे राहुरी फॅक्टरी बिट सांभाळत आहेत.
अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी जिल्ह्यातील अनेक पोलिसांना पदोन्नती दिली असून पोलीस हेडकोस्टबल ज्ञानदेव गर्जे यांना सहायक पोलिस उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती मिळाली आहे.
सन ११९३ साली औरंगाबाद येथे पोलीस खात्यात कॉन्स्टेबल पदावर रुजू झाले. या काळात त्यांनी औरंगाबाद शहर वाहतूक , पोलीस ठाणे येथे नोकरी केली. तदनंतर २००४ साली पोलीस हेडकोन्स्टेबल म्हणून पदोन्नती मिळल्यानंतत नगर जिल्ह्यातील जामखेड , कोतवाली, पारनेर तालुका , महामार्ग सुरक्षा आदी पोलीस ठाण्यात काम केले असून ३ वर्षापासून दिनकर गर्जे सेवेत असून राहुरी फॅक्टरी बिटचा कारभार सांभाळत आहे.
नुकतीच त्यांना पोलीस हेडकोन्स्टेबल या पदावरून सहायक पोलिस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती मिळाली आहे.
याबद्दल पोलीस निरीक्षक संजय सोनवणे यांनी त्यांचा सन्मान केला आहे. यावेळी पोलीस कॉन्स्टेबल सुनील निकम, सोमनाथ जायभाये उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत