कोपरगाव(वेबटीम) सैनिक म्हटलं की शिस्त आणि प्रामाणिक पणा त्यांच्यात असतोच अशाच एका प्रसंगाने माजी सैनिकाचा प्रामाणिकपणा समोर आला आहे. शि...
कोपरगाव(वेबटीम)
सैनिक म्हटलं की शिस्त आणि प्रामाणिक पणा त्यांच्यात असतोच अशाच एका प्रसंगाने माजी सैनिकाचा प्रामाणिकपणा समोर आला आहे. शिर्डी जवळील सावळीविहिर फाट्याजवळ रस्त्यावर मिळालेला पाकीट माजी सैनिकाने संबंधित पत्रकाराला महत्त्वाची कागदपत्रे आणि रोख रकमेसह परत केल्याने माजी सैनिक प्रवीण बापूसाहेब पठारे यांचे अभिनंदन केले जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की एबीपी माझाचे जिल्हा रिपोर्टर नितीन ओझा यांचा पैशाचा पाकीट सावळीविहिर फाटा परिसरात हरवला होता दोन दिवसांपूर्वी सदर पाकीट आत्मा मालिका शैक्षणिक संकुलात मिलिट्री समन्वयक असलेले प्रवीण पठारे यांना सापडला त्यांनी तो पाकीट आत्मा मालिका शैक्षणिक संकुलाचे व्यवस्थापक साईनाथ वर्पे यांच्याकडे सुपूर्द केला. वर्पे यांनी शुक्रवारी सदर पाकीट मालकाचा शोधघेण्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल केली आणि काही मिनिटात त्यांना पत्रकार नितीन ओझांचा फोन आला. नितिन ओझा संगमनेरला असल्याने वर्पे यांनी प्रवीण पठारे यांच्या उपस्थितीत ओझा यांचे कोपरगाव येथील मित्र महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनचे जिल्हा रिपोर्टर मोबीन खान यांच्याकडे तो पाकीट महत्त्वाची कागदपत्रे आणि रोख रकमेसह प्रामाणिकपणे परत दिला. दरम्यान नितीन ओझा यांना महत्त्वाची कागदपत्रे परत मिळाल्याने नव्याने कागदपत्रे बनवण्याचा ताण वाचला असून पाकिटात असलेली रोख रक्कम मिळाल्याने त्यांनी प्रवीण पठारे आणि साईनाथ वर्पे यांचे आभार मानले आहे.
*हरवले सापडले उपक्रमाचा फायदा*
आत्मा मालिक शैक्षणिक संकुलात गेल्या अनेक दिवसांपासून हरवले सापडले उपक्रम सुरू आहे. या शैक्षणिक संकुलात आठ हजार विद्यार्थी आणि मोठा स्टाफ असल्याने काही ना काही वस्तू हरवत असते, त्यामुळे ज्याला कोणाला ती वस्तू सापडेल तो ते कार्यालयात जमा करतो आणि त्यानंतर संबंधिताला ती वस्तू परत मिळते,त्याच उपक्रमांतर्गत या माजी सैनिकाला रस्त्यावर मिळालेली वस्तू देखील आपल्या कार्यालयात जमा केली आणि त्यांनी मूळ मालकाचा शोध घेत त्यांच्यापर्यंत ती वस्तू पोहोचवली. खरोखरच अशा प्रकारच्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रामाणिकपणाची भावना त्याचबरोबर वस्तू हरवलेल्यांना त्यांची वस्तू परत मिळते त्यामुळे अशा उपक्रमाचे केले तेवढे कौतुक कमीच आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत