पारनेर : प्रतिनिधी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पारनेर-नगर मतदारसंघाचे आमदार नीलेश लंके यांनी मतदारसंघातील नागरीकांना तब्बल ४४६ को...
पारनेर : प्रतिनिधी
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पारनेर-नगर मतदारसंघाचे आमदार नीलेश लंके यांनी मतदारसंघातील नागरीकांना तब्बल ४४६ कोटी १० लाख ६० हजार रूपयांचे गिफ्ट दिले आहे. दोन महिन्यापूर्वी मोहटादेवी यात्रोत्सवाच्या शुभारंभासाठी तालुक्याच्या दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आ. लंके यांना वर्षभरात ५००कोटींचा निधी देण्याचा शब्द दिला होता. दोन महिन्यांचा कालावधी पुर्ण होण्याआगोदरच पवार यांनी ४०० कोटींहून अधिक निधी देत दिलेला शब्द जवळपास पुर्ण केला आहे.
विविध रस्त्यांच्या कामासाठी मंजुर झालेला निधी पुढीलप्रमाणे :
१)देवीभोयरे फाटा-पारनेर-सुपा-सारोळा-खडकी रस्ता रा सुधारणा करणे ३६० कोटी, २)पारनेर-बाबुर्डी-विसापूर रस्ता पोहच मार्गासह मोठया पुलाचे बांधकाम करणे ७ कोटी ५० लाख, ३) वाळवणे-पिंपरीगवळी-रांजणगांव-भोयरेगांगर्डा-पळवे बुदु्क ते प्र रा मा ५ रस्ता मध्ये सुधारणा करणे ६ कोटी ५० लाख ४) प्रजिमा ५२ ते पारनेर-लोणीहेवली माथा प्रजिमा मध्ये सुधारणा करणे ५ कोटी, ५) देवीभोयरे फाटा-सुपा-सारोळा रस्ता रामा ६९ मध्ये सुधारणा करणे २ कोटी २० लाख, ६) देवीभोयरे फाटा-सुपा-सारोळा रस्ता सुधारणा करणे १ कोटी ६० लाख, ७) पारनेर-जामगांव-भाळवणी रस्ता सुधारणा करणे १ कोटी ५ लाख, ८) वाळवणे-पिंपरीगवळी-रांजणगांव-भोयरेगांगर्डा-पळवे बुद्रुक रस्ता सुधारणा करणे २ कोटी २५ लाख, ९) रामा ६९ ते वाळवणे-पिंपरीगवळी-रांजणगांव-भोयरेगांगर्डा पळवे बुद्रुक प्ररामा ५ रस्ता मध्ये सुधारणा करणे २ कोटी १५ लाख, १०) कान्हूर-वेसदरे-वडझिरे-चिंचोली-सांगवी सुर्या ते जवळा रस्ता सुधारणा करणे २ कोटी २५ लाख, ११) रेनवडी-चोंभूत-वडनेरबुद्रुक-निघोज-पिंपरीजलसेन-गांजीभोयरे-पानोली-गटेवाडी प्ररामा ५ रस्ता मध्ये सुधारणा करणे १ कोटी ५ लाख, १२) मांडवे-देसवडे- पोखरी-पिंपळगांवरोठा-अक्कलवाडी रस्ता प्रजिमा २९ मध्ये सुधारणा करणे १ कोटी ८० लाख १३) रामा ५० ते बोटा-अकलापूर-पळशी-वनकुटे रस्ता सुधारणा करणे १ कोटी ३० लाख, १४) प्रजिमा ५० ते हिवरे कोरडा-तिखोल-पिंपळगांवतुर्क-कान्हूरपठार-पिंपळगांवरोठा-खंडाबाची वाडी-गारखींडी ते तालुका हदद रस्ता सुधारणा करणे २ कोटी ३०लाख, १५) रामा ५८ ते खारे कर्जुणे-हिंगणगांव-निमगांववाघा रस्ता सुधारणा करणे १ कोटी८० लाख, १६) निमगांवघाणा ते खातगांव ते रामा २२२ ते हिवरेबाजार-चास ते अकोळनेर-जाधवाडी-खडकी ते रामा ६९ रस्ता सुधारणा करणे १कोटी ८० लाख १७) प्रजिमा १९५ ते जिल्हा हदद रस्ता सुधारणा करणे १ कोटी २५ लाख १८) प्रजिमा ५० ते गोरेगाव-डिकसळ-लोणीहवेली-हंगा-शहांजापुर-सुपा रस्ता सुधारणा करणे २ कोटी २० लाख १९) लोणीमावळा ते पाबळ कवडे मळा रस्ता सुधारणा करणे ६० लक्ष, २०) किन्ही ते सोनांबी रस्ता सुधारणा करणे ६० लक्ष २१) गोरेगांव ते ब्राम्हण दरा ग्रामीण मार्ग सुधारणा करणे ४० लक्ष २२) शिरापूर ते अळकुटी फाटा रस्ता ग्रामीण मार्ग सुधारणा करणे ६० लक्ष २३) गारगुंडी ते इजिमा ३२६ ला मिळणारा रस्ता सुधारणा करणे ६० लक्ष, २४) मांडवेखुर्द देववाडी ते नागापूर रस्ता सुधारणा करणे ९० लक्ष, २५) देवीभोयरे फाटा ते पाडळीदर्या-वडझिरे-निघोज रस्ता सुधारणा करणे ६० लक्ष, २६) कर्जुले हर्या ते काळेझाप वस्ती रस्ता सुधारणा करणे ५० लक्ष, २७) यादववाडी ते तुकाईमाता मंदीर रस्ता सुधारणा करणे ५० लक्ष, २८) देवीभोयरे ते शिरापूर रस्ता सुधारणा करणे ५० लक्ष, २९) काताळवेढा ते जिल्हा हदद रस्ता सुधारणा करणे ४० लक्ष ३०) गुणोरे ते जवळा रस्ता सुधारणा करणे ५० लाख ३१) रा मा ६७ ते विरोली रस्ता सुधारणा करणे ५० लाख ३२) निघोज बोदगेवाडी ते गुणारे रस्ता सुधारणा करणे ६० लक्ष ३३) वडनेर बुद्रुक ते येवले मळा वाकन मळा रस्ता सुधारणा करणे ८० लक्ष, ३४) हत्तलखिंडी ते पुणेवाडी रस्ता सुधारणा करणे ५० लक्ष, ३५) ढवळपुरी ते ठाकरवाडी रोड ते भोकरदरा रस्ता सुधारणा करणे ५० लाख, ३६) कुरूंद गाव ते शिवाई देवी माता रस्ता सुधारणा करणे ६० लक्ष, ३७) नेप्ती ते रानमला रस्ता सुधारणा करणे ५० लक्ष, ३८) अकोळनेर ते हरिजन वस्ती रस्ता सुधारणा करणे २० लक्ष, ३९) सारोळा कासार ते घोडकेवाडी रस्ता सुधारणा करणे ५० लक्ष, ४०) देहरे ते पिंपरीघुमट रस्ता सुधारणा करणे ५० लक्ष, ४१) जखणगांव ते पिंपळगांव वाघा रस्ता सुधारणा करणे ५० लक्ष, ४२) सोनेवाडी ते चास रस्ता सुधारणा करणे ५० लक्ष, ४३) चिकणेवाडी ते कोरठण रस्ता सुधारणा करणे ६० लक्ष, ४४) गारखिंडी पोखरकर झाप-शेरीकासारे-बाभुळवाडे रस्ता सुधारणा करणे ५० लक्ष, ४५) प्रजिमा १९४ ते शहांजापुर रस्ता सुधारणा करणे ४० लक्ष, ४६) वाळवणे ते पठारे वस्ती रस्ता सुधारणा करणे ६० लक्ष, ४७) शिरापूर-नरसाळेवाडी रस्ता पोहच मार्गासह पुलाचे बांधकाम करणे व रस्त्याची सुधारणा करणे ३ कोटी ४६ लाख ६० हजार
पारनेर ते सुपा रस्ता चारपदरी होणार
पारनेर शहर ते सुपा रस्ता चार पदरी होणार असून देवीभोयरे फाटा ते दौंड रस्ता या रस्त्याच्या कामासाठी ३६० कोटींचा निधी मंजुर करण्यात आला असून त्यातून या ४५ किलोमिटर लांबीच्या रस्त्याचे काम होणार आहे. या रस्त्याच्या माध्यमातून दोन प्रमुख रस्ते जोडले जाणार आहेत.
वळसे पाटील यांचे आभार
वडनेर बुद्रुक ते वडनेर खुर्द या पारनेर व शिरूर तालुक्याला जोडणाऱ्या रस्त्याच्या कुकडी नदीवरील पुलासाठी निधी मंजुर करण्यासाठी आपण सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता. वळसे पाटील यांनी त्याची दखल घेउन पुलासाठी १० कोटींचा निधी मंजुर केल्याबद्द ल त्यांचे आभार.
नीलेश लंके(आमदार)
पळशीच्या आश्रमशाळेसाठी १३ कोटी
पळशी येथील शासकिय आदीवासी आश्रमशाळा येथे मुलांचे वसतीगृह इमारत बांधकाम करण्यासाठी १३ कोटी ४ लाख रूपयांचा निधी मंजुर करण्यात आला असून यामुळे आदीवासी विद्यार्थ्याची सुविधा होणार आहे.
बंधाऱ्यासाठी ६० लाख
गटेवाडी येथील दरा पाणी पुरवठा विहीर येथे सिमेंट बंधारा बांधणे २० लक्ष, नारायणगव्हाण येथे जाधवदरा येथे सिमेंट बंधारा बांधणे २० लक्ष, नारायणगव्हाण येथील तुकाईमळा येथे सिमेंट बंधारा बांधणे २० लाख असा एकूण ६० लाखांचा निधी बंधाऱ्यासाठी मंजुर करण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत