आंबी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील केसापूर येथे भिमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६७ वा महापरिनिर...
आंबी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील केसापूर येथे भिमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६७ वा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला.
याप्रसंगी झालेल्या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस सरपंच सुशीलाताई दादासाहेब मेहेत्रे, सोसायटीच्या सभागृहात माजी सरपंच गुलाबराव डोखे व माजीचेअरमन राजेंद्र खैरे, ग्रामपंचायतमध्ये पत्रकार संदिप पाळंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमास माजी सरपंच गोकुळ टाकसाळ, दादासाहेब मेहेत्रे, दिपक पवार, चेअरमन ललित टाकसाळ, भिमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हा सरचिटणीस व ग्रामपंचायत सदस्य अनिल बोधक, भारत रणदिवे, मधुकर रणदिवे, रावसाहेब रणदिवे, विलास रणदिवे, भाऊसाहेब डोखे, बाळकृष्ण मेहेत्रे, संजय भोसले, नानासाहेब रणदिवे, भगीरथ रणदिवे, भगवान रणदिवे, सुनील बोधक, रविंद्र गायकवाड, दिलावर शेख, सोपान भगत, रमेश गायकवाड, रोहिदास रणदिवे, ज्ञानेश्वर रणदिवे आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत