राहुरी (प्रतिनिधी) श्री दत्तजयंतीच्या पर्वणीत आज रविवार दि.२४ डिसेंबर पासून सायंकाळी ७ ते ९ संगीत नवनाथ कथेस श्रीक्षेत्र बैरागी बाबा समाध...
राहुरी (प्रतिनिधी)
श्री दत्तजयंतीच्या पर्वणीत आज रविवार दि.२४ डिसेंबर पासून सायंकाळी ७ ते ९ संगीत नवनाथ कथेस श्रीक्षेत्र बैरागी बाबा समाधी मंदिर महाडूक सेंटर येथे प्रारंभ होत आहे. महंत अरुणनाथगिरीजी महाराज मठाधिपती, श्रीक्षेत्र अडबंगनाथ संस्थान, भामानगर यांच्या सुश्राव्यवाणीतून नवनाथ कथेचे विवेचन होणार आहे. तरी भाविकांनी ह्या कथेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
श्रीक्षेत्र महाडूक सेंटर ता. राहुरी येथे संत बैरागीबाबांचे समाधी वृंदावन आहे. बाबांच्या पुण्यतिथीनिमित्त हा समाधी सोहळा आयोजित केला जातो. त्यानिमित्ताने १९९१ पासून हा सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. परिसरातील भाविंक या उत्साहात मोठ्या संख्येने उपस्थित राहून ज्ञानदानाचा व अन्नदानाचा लाभ घेतात. सालाबादप्रमाणे यावर्षी संगीत नवनाथ कथा आयोजित केली आहे. कथेची सांगता रविवार दि. ३१ डिसेंबर रोजी सकाळी ९वा. महंत अरुणनाथगिरीजी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार आहे.तरी पंचक्रोशीतील भाविकांनी ह्या ज्ञानयज्ञाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत