राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरीत आज रविवार दिनांक २४ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता श्रीराम मंगल अक्षता कलश भव्य शोभायात्रा आगमन होणार...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरीत आज रविवार दिनांक २४ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता श्रीराम मंगल अक्षता कलश भव्य शोभायात्रा आगमन होणार असून दुपारी दोन वाजे पासून प्रारंभ होणार आहे.
प्रभू श्रीरामचंद्राच्या कृपा आशीर्वादाने तीर्थक्षेत्र आयोध्या येथील श्रीरामांचे भव्य मंदिर निर्माण होत असून लवकरच प्रभू राम लल्ला देवालयात विराजमान होणार आहेत .
या अक्षतांच्या मंगल कलशाची भव्य मिरवणूक राहुरी फॅक्टरी शहरातून निघणार आहे.
या मिरवणुकीचा मार्ग श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, सेंट्रल बँक,शांती चौक मित्र मंडळ, अंबिका नगर, वैष्णवी चौक, ओंकारेश्वर मित्र मंडळ तसेच वृंदावन कॉलनी आणि या कलश पूजन वितरणाचा समारंभ व महाप्रसाद वाटप पावन गणपती मित्र मंडळ गुरुकुल वसाहत या ठिकाणीहोणार आहे.
तरी या मंगल यात्रेत सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते तसेच श्रीराम भक्तांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत