आंबी (वेबटीम) राहुरी तालुक्यात सहकार क्षेत्रात नावलौकिक असलेल्या अंमळनेर विविध कार्यकारी सेवा संस्थेचा रोप्य महोत्सव समारंभ तालुक्यातील राजक...
आंबी (वेबटीम)
राहुरी तालुक्यात सहकार क्षेत्रात नावलौकिक असलेल्या अंमळनेर विविध कार्यकारी सेवा संस्थेचा रोप्य महोत्सव समारंभ तालुक्यातील राजकीय, सामाजिक, सहकार क्षेत्रात नावाजलेल्या विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बापूराव जाधव हे होते.
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाल्यानंतर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वसंतराव कोळसे यांनी प्रास्ताविक करून संस्थेचा लेखाजोखा मांडला. याप्रसंगी तनपुरे कारखान्याचे माजी संचालक, कृषिभूषण सुरसिंग पवार, माजी अध्यक्ष उत्तम म्हसे, शरद पेरणे, रमेश पवार, अशोक गागरे, मियाँसाहेब पतसंस्थेचे चेअरमन शाम निमसे, रवींद्र म्हसे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल भनगडे, तालुका विकास अधिकारी श्री. मंडलिक, तालुका दूध संघाचे अध्यक्ष तान्हाजी धसाळ, गोरख भगत, संपत काळे, ललित टाकसाळ, कुंडलिक खपके, ऍड. दीपक बारहाते, शिवाजी जाधव, दत्तू पारखे, प्रदीप होन आदी मान्यवरांनी संस्थेला शुभेच्छा देत मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यमान चेअरमन किरण कोळसे, व्हा. चेअरमन राहुल डुकरे, संचालक भाऊसाहेब साळुंके, भगवान जाधव, संजय कोळसे, अच्युतराव जाधव, सुनील औताडे, रमेश कोळसे, सुनीताताई कोळसे, योगेश डुकरे, वैशाली कोळसे, बापूराव जाधव, बाळासाहेब साळुंके, पंढरीनाथ जाधव, सचिव गीताराम काळे, सहसचिव अशोक निमसे आदींनी मेहनत घेतली. आंबीचे उपसरपंच विजय डुकरे यांनी सूत्रसंचालन केले तर आभार चेअरमन किरण कोळसे यांनी मांडले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत