संगमनेर(वेबटीम) एस टी महामंडळाची राहुरीकडून संगमनेरला जाणारी बस संगमनेर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील पिंपळने गावामध्ये एक्सेल तुटल्यामुळे ...
संगमनेर(वेबटीम)
एस टी महामंडळाची राहुरीकडून संगमनेरला जाणारी बस संगमनेर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील पिंपळने गावामध्ये एक्सेल तुटल्यामुळे पलटी झाली आहे. या बसमध्ये मुख्यत्वे करून विद्यार्थी प्रवास करत होते.
या घटनेत काही विद्यार्थ्यांना किरकोळ जखमा असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी सोमनाथ वाकचौरे यांनी संगमनेर पोलीसांना घटनास्थळी पाठविले. पोलीस प्रशासन व स्थानिक नागरिक यांच्या मदतीने किरकोळ जखमी असणाऱ्या विद्यार्थ्यांना उपचारासाठी संगमनेर शहरात पाठविण्यात आले.
पालकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. पोलीस प्रशासन पुढील तपास करत आहे असे आवाहन डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी केले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत