देवळाली प्रवरा(वेबटीम) देवळाली प्रवरा येथील श्री साई प्रतिष्ठाण व शहरवासिय आयोजित श्री साई सच्चरित्र पारायण सोहळा व भव्य कीर्तन महोत्सवाचे आ...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
देवळाली प्रवरा येथील श्री साई प्रतिष्ठाण व शहरवासिय आयोजित श्री साई सच्चरित्र पारायण सोहळा व भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन दिनांक ३ जानेवारी ते १० जानेवारी २०२४ दरम्यान करण्यात आले आहे.
गेल्या १० वर्षापासून महंत उद्धव महाराज मंडलीक यांच्या मार्गदर्शनाखाली श्री साई प्रतिष्ठान व देवळाली प्रवरा शहरवासिय यांच्या वतीने साई सच्चरित्र पारायण याचे आयोजन करण्यात येते.या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते .यावर्षी पारायण याबरोबरच किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे या महोत्सवाचा प्रारंभ ३ जानेवारी रोजी होणार असून सांगता १० जानेवारी २०२४ रोजी होणार आहे . या निमित्ताने कलश पूजन व मूर्ती अधिष्ठान ३जानेवारी रोजी सकाळी ठीक ७ वाजता संपन्न होणार आहे. त्यानंतर व्यासपीठ चालक ह.भ.प.गणेश महाराज मुसमाडे(तांभेरे) यांच्या अधिपत्याखाली पारायण वाचनास सुरुवात होणार आहे. ज्यांना साई चरित्र पारायण वाचनास बसावयाचे त्यांना ग्रंथ उपलब्ध करून दिले जाणार आहे.
या उत्सवानिमित्त सकाळी ४ वा, काकडा आरती, सकाळी ८ ते १२ साई सच्चरित्र पारायण ,माध्यन्ह आरती ,सायंकाळी ४ वाजता हरिपाठ , सायंकाळी - ६ वाजता धूप आरती, रात्री ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत कीर्तन त्यानंतर शेजाआरती व दररोज सकाळी नाश्ता, दुपारी व संध्याकाळी महाप्रसाद वाटप दानशूर अन्नदात्यांच्या सहकार्याने केला जाणार आहे.
यंदाच्या उत्सवानिमित्त महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकारांची कीर्तन सेवा संपन्न होणार आहे.
०३ जानेवारी रोजी ह.भ.प.नामदेव महाराज जाधव शास्त्री (जातप), ०४ जानेवारी रोजी ह.भ.प.दीपक महाराज देशमुख (अगस्ती देवस्थान, अकोले), ५ जानेवारी रोजी ह.भ.प.उमेश महाराज दशरथे (परभणी),.६ जानेवारी रोजी ह.भ.प.एकनाथ महाराज चत्तर(पारनेर), ७ जानेवारी रोजी ह.भ.प.जयेश महाराज भाग्यवंत(भिवंडी, मुंबई),८ जानेवारी रोजी ह.भ.प.अक्रुर महाराज साखरे(बीड) व ९ जानेवारी रोजी ह.भ.प.महंत उद्धव महाराज मंडलीक यांची कीर्तन सेवा होईल.
९ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता ग्रंथ मिरवणूक व ६ वाजता दीपप्रज्वलन कार्यक्रम होईल.
१०जानेवारी रोजी सकाळी ९ ते ११ ह.भ.प पांडुरंग महाराज गिरी (श्री. क्षेत्र वावी) यांचे काल्याचे कीर्तन होईल.व त्यानंतर भव्य महाप्रसादाचे आयोजन श्री साई प्रतिष्ठान व देवळाली प्रवरा शहरवासीय यांचे वतीने करण्यात आले आहे.
तरी या पारायण सोहळ्यास व कीर्तन महोत्सवास आपण सर्वांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. असे आवाहन श्री साई प्रतिष्ठान व देवळाली प्रवरा शहरवासियांनी केले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत