पुणे(वेबटीम) आर.एम.धारीवाल सिंहगड मॅनेजमेंट स्कुल कोंढापुरी, पुणे येथे दि. २५ डिसेंबर २०२३ रोजी अगदी उत्साहपूर्ण वातावरणात तीन दिवशीय निस...
पुणे(वेबटीम)
आर.एम.धारीवाल सिंहगड मॅनेजमेंट स्कुल कोंढापुरी, पुणे येथे दि. २५ डिसेंबर २०२३ रोजी अगदी उत्साहपूर्ण वातावरणात तीन दिवशीय निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे ७ वे पर्यावरण संमेलनाचा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला .
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रसिद्ध हशांचा फवारा उडवून प्रत्येक माणसाचे आरोग्य समृद्ध करण्यासाठी प्रयत्नशील असणारे विनोद सम्राट श्री मकरंद टिल्लू तर प्रमुख पाहुणे श्री.प्रभाकर तावरे साहेब ( माजी आरोग्य अधिकारी) , संस्थेचे अध्यक्ष श्री प्रमोददादा मोरे, सचिव सौ वनश्री गुणवरे ( मोरे ),वनश्री पुरस्कार व ५० लाखांचा ग्रामसमृद्ध पुरस्कारप्राप्त कोंढापुरी गावच्या सरपंच - सौ अपेक्षाताई गायकवाड ,कोंढापुरी सोसायटी मा चेअरमन ,मा सरपंच श्री.स्वप्निलभैय्या गायकवाड , ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष धनंजयराव गायकवाड , श्री अशोकशेठ गायकवाड, सिंहगड संस्था कॅम्पस डायरेक्टर - डॉ अनिता माने, यांचे प्रमुख उपस्थितीत समारोप कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी गोष्ट १०० कोटीची पाणी बचतीची यावर आधारित भरीव कार्य केलेले हास्यसम्राट मकरंद टिल्लू यांनी पर्यावरणाचे महत्व पाण्याशी जोडत आजकाल वाढणारी सिमेंटची जंगले , भरमसाठ वृक्षतोड , जागतिक तापमानवाढ भयावह असून पर्यावरण संवर्धन करून वृक्ष लागवड व संवर्धन करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही असे आवर्जून सांगितले. तसे केले नाहीतर येणारा भविष्यकाळ अतिशय कठीण असेल . तसेच पशुसंवर्धन , खनिज पदार्थ आणि पाणी यासारखी नैसर्गिक साधनसंपत्ती जपून वापरणे ही काळाची गरज असेल. पाऊस जास्त कसा पडेल हे सर्वांना समजावून सांगितले. तर मंडळाचे अध्यक्ष श्री प्रमोद मोरे यांनी संस्था अहवाल वाचन करून विविध ठराव मांडून सर्वानुमते ते मंजूर करण्यात आले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे सचिव श्रीमती वनश्रीताई गुणवरे (मोरे) यांनी केले.या संमेलनास नगर , सातारा,सांगली,नाशिक, सोलापूर, चिपळूण ,ठाणे, नंदुरबार अशा २२ जिल्ह्यातून २९० निसर्ग व पर्यावरणप्रेमींनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद नोंदवला व उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेतला.
तसेच संस्थेने वर्षभरामध्ये विविध जिल्ह्यांमध्ये राबवलेले विविध पर्यावरण संवर्धन व समाजिक उपक्रमांची जसे की , पशुपक्ष्यांना मूठभर धान्य व घोटभर पाणी मिळावे त्यासाठी मंडळामार्फत विविध शाळा , महाविद्यालये ,शासकीय कार्यालये ,जॉगिंग पार्क याठिकाणी जाऊन मातीची भांडी भेट दिली , साईबन अहमदनगर येथे सामुदायिक रित्या १००० वृक्षांचे रोपण केले अशा उपक्रमांची अर्ध्या तासाची डोक्युमेंट्री दाखवण्यात आली. गेल्या वर्षामध्ये भरीव व दर्जेदार राबवलेल्या उपक्रमशील हिंगोली , नाशिक व सांगली जिल्ह्यातील निसर्गप्रेमीना मान्यवरांच्या शुभहस्ते प्रथम तीन क्रमांकांचे जिल्हे निवडून त्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले, या संमेलनादरम्यान प्रसिद्ध शेंद्रिय शेती तज्ञ- डॉ प्रशांत नाईकवाडी यांनी आरोग्यवर्धक शेंद्रीय शेती या विषययावर ,मा.श्री रणजित शानबान - उपसंचालक विज्ञान आश्रम पाबळ यांनी विज्ञान पूरक पर्यावरण क्षेत्रातील विविध व्यवसाय संधी या विषयावर तर डॉ सुनील भोईटे यांनी पर्यावरण संवर्धन तात्विक व अध्यात्मिक दृष्टी या विषयांवर , चिंचवड महापालिका मा आरोग्य अधिकारी श्री प्रभाकर तावरे यांनी आरोग्याबद्दल दक्ष राहून सामाजिक व शारीरिक स्वास्थ्य टिकण्यासाठीचे महत्व व उपाय या विषयावर व्याख्यान देत मार्गदर्शन केले.
हे संमेलन यशस्वी होण्यासाठी मंडळाचे कार्याध्यक्ष श्री प्रमोद काकडे सर , श्रीमती छायाताई राजपूत , मंडळाचे सचिव- (कार्य व नियोजन) श्री अनिल लोखंडे सर , पुणे जिल्हाध्यक्ष - श्री मारुती कदम, नगरचे जिल्हाध्यक्ष तुकाराम अडसूळ , श्री प्रकाश केदारी , विलास महाडिक, श्री सुभाष वाखारे, प्रा. संतोष परदेशी, श्री चंद्रकांत भोजने , श्री गायकवाड सर ,श्री.अर्जुनराव राऊत , श्री. हरिदास शिंदे, रुपाली नलावडे , सुहास गावित , लतिका पवार ,स्वाती अहिरे आदिनी विशेष परिश्रम घेत ७ वे पर्यावरण संमेलन यशस्वी केले. सर्व पर्यावरण व सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांना पुढील वर्षभर कार्य करण्यासाठी प्रेरणा व नवसंजीवनी मिळाल्याबद्दल सर्वांनी समाधान व्यक्त केले आणि सर्वांनी भावुक होऊन एकमेकांना कार्यासाठी निरोप घेतला.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत