दया, धर्म, परोपकार भावना असावी मनी, दुसऱ्यांसाठी जगून थोडे जीवन लावावे सत्कारणी..! मकरंदा सारखी गोड मधाळ झरावी वाणी! प्रेमरागाची धून छेडत ...
दया, धर्म, परोपकार
भावना असावी मनी,
दुसऱ्यांसाठी जगून थोडे
जीवन लावावे सत्कारणी..!
मकरंदा सारखी गोड
मधाळ झरावी वाणी!
प्रेमरागाची धून छेडत
गावी मधुर गाणी..!
झऱ्यासारखे निर्मळ मन
सदा खळखळ वाहावे!
अपेक्षांची माळ न ओवता
निस्वार्थ सेवा करीत राहावे..!
वृक्षसारखे निरपेक्ष जीवन
जगावे आपणही दातृत्वाचे
घाव झेलूनही प्रकृतीचे
तत्व सोडू नये दानत्वाचे...
सागरसारखे अथांग मन
सामावून घ्यावे सकलास
आभाळ माया पेरीत जावे
सार्थ करावे मनुष्य जन्मास...!
*सौ निशा खापरे...नागपूर*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत