अहमदनगर(वेबटीम) नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथे ब्रम्हीभूत ह.भ.प. बाळकृष्ण महाराज भोंदे यांच्या द्वितीय पुण्यस्मरण सोहळा व त्यानिमित्त...
अहमदनगर(वेबटीम)
नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथे ब्रम्हीभूत ह.भ.प. बाळकृष्ण महाराज भोंदे यांच्या द्वितीय पुण्यस्मरण सोहळा व त्यानिमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आज बुधवार दि.२७ डिसेंबर २०२३ ते ३ जानेवारी २०२४ या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्ताने सामूहिक काकडा भजन, विष्णूसहस्त्रनाम, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ, प्रवचन, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे. दररोज भाविकांना नाश्ता व महाप्रसाद दिला जाणार असून यासाठी समाजातील दानशूर मंडळींचे सहकार्य लाभणार आहे.
सप्ताह काळात दररोज सायंकाळी ७ ते ९ या वेळेत होणाऱ्या कीर्तन सेवेत आज बुधवार २७ डिसेंबर रोजी विदर्भरत्न संजय महाराज पाचपोर, २८ डिसेंबर रोजी प्रेममूर्ती उमेश महाराज दशरथे, २९ डिसेंबर रोजी डॉ.किसन महाराज साखरे, ३० डिसेंबर रोजी डॉ.माणिक महाराज मुखेकर, ३१ डिसेंबर रोजी गाथामूर्ती रामभाऊ महाराज राऊत, १ डिसेंबर रोजी अद्वैतवेदांत भास्कर पुंडलिक महाराज जंगले शास्त्री, २ डिसेंबर रोजी डॉ. चैतन्य महाराज देगूलकर यांचे कीर्तन तर ३ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते १२ डॉ.नारायण महाराज जाधव यांचे काल्याचे कीर्तन व त्यानंतर महाप्रसाद वाटपाने सोहळ्याची सांगता होणार आहे.
तरी भाविकांनी या ज्ञानदान व अन्नदान सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत