देवळाली प्रवरा(वेबटीम) राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील सुपुत्र पोलीस उपनिरीक्षक संदीप संसारे यांचा देवळाली प्रवरा बाजारतळ येथे सन्...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील सुपुत्र पोलीस उपनिरीक्षक संदीप संसारे यांचा देवळाली प्रवरा बाजारतळ येथे सन्मान करण्यात आला.
2022 च्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेतील 251 उमेदवारांचे 3 एप्रिल 2023 पासून महाराष्ट्र पोलीस प्रबोधनी नाशिक येथे प्रशिक्षण सुरू होते. 9 महिन्याचे खडतर प्रशिक्षण पार पडल्यानंतर नाशिक येथे सत्र क्रमांक 123या तुकडीचा दीक्षांत समारंभ बुधवारी माजी पोलीस महासंचालक तथा सदस्य राज्य मानवी हक्क आयोग महाराष्ट्र राज्य श्री संजय कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळेस या तुकडीतील अहमदनगर पोलीस दलात कार्यरत असणारे देवळाली प्रवरा येथील संदीप संसारे यांनी आपल्या वडीलांच्या डोक्यावर आपली टोपी घालून आपले यश वडीलांच्या चरणी अर्पण केले.
संदीप संसारे हे देवळाली प्रवरात आले असता काँग्रेसचे जिल्हा सचिव अजय खिलारी यांनी त्यांचा सन्मान केला.
यावेळी राकेश संसारे, सागर संसारे, रवी शिंदे, आकाश संसारे, दीपक पाडळे, माऊली आढाव, शकिल पटेल, असिफ पटेल, विलास संसारे आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत