राहुरीत अग्नीशास्त्रासह गांजाची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरीत अग्नीशास्त्रासह गांजाची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक

  राहुरी(वेबटीम)  राहुरी शहरातील नगर-मनमाड मार्गावर मुळा नदी पात्रा नजीक अग्नीशास्त्रासह गांजाची वाहतूक करणाऱ्या दोघांना राहुरी पोलिसांनी अट...

 राहुरी(वेबटीम)



 राहुरी शहरातील नगर-मनमाड मार्गावर मुळा नदी पात्रा नजीक अग्नीशास्त्रासह गांजाची वाहतूक करणाऱ्या दोघांना राहुरी पोलिसांनी अटक केली आहे.पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली आहे.


आज दिनांक 19 जानेवारी 2024 रोजी राहुरी पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की, राहुरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कोणीतरी अज्ञात इसम देशी पिस्टल विक्री करता घेऊन येणार आहे. सदर प्राप्त माहितीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांचे नेतृत्वात  पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे, पोलीस हवालदार गायकवाड सुरज, पोलीस हवालदार राहुल यादव, पोलीस हवालदार विकास साळवे, पोलीस कॉन्स्टेबल नदीम शेख, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद ढाकणे,  पोलीस नाईक प्रवीण अहिरे, पोलीस नाईक प्रवीण बागुल, पोलीस कॉन्स्टेबल गोवर्धन कदम, पोलीस कॉन्स्टेबल अजिनाथ पाखरे यांनी सापळा रचला असता प्राप्त माहितीनुसार काळा रंगाचे मोपेड गाडी क्रमांक MH 16 DH 5613 यामध्ये जॉन कॅसिनो परेरा, वय 36 दोघे राहणार अहमदनगर, अब्दुल वाहद सय्यद शाबिर वय 31, हे देशी बनावटीचे पिस्टल 3 काडतुस सह व सोबतच गाडीचे डिक्की मध्ये लपवलेल्या 1440 gm गांजा    मिळून आल्याने एकूण 104000/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून NDPS कायद्यान्वये (CHANCE Raid) व Arms Act कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपी अटक करण्यात आलेले आहे. 


अटक केलेल्या दोन्ही आरोपींवर प्रत्येकी दोन दोन गंभीर गुन्हे असून कोतवाली पोलीस स्टेशन गु र न 470/21, चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन गु र न 10/16, कोतवाली पोलीस स्टेशन  गु र न 266/12 व गु र न 152/2017 असे एकूण 4 गुन्हे दाखल आहेत दाखल आहेत.  पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे करत आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत