अहमदनगर/वेबटीम:- नाशिक येथील कालिका देवी मंदिर संस्थानच्या वतीने दिला जाणारा पत्रकारिता पुरस्कार महाराष्ट्र राज्य जिल्हा ग्रामीण पत्रकार संघ...
अहमदनगर/वेबटीम:-
नाशिक येथील कालिका देवी मंदिर संस्थानच्या वतीने दिला जाणारा पत्रकारिता पुरस्कार महाराष्ट्र राज्य जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नवगिरे, जिल्हा सचिव श्रीकांत जाधव, जिल्हा कार्याध्यक्ष संदीप गाडेकर यांना जाहीर झाला आहे. ५जानेवारी २०२४ रोजी पत्रकार दिनाचे औचित्य साधून "कै. कृष्णराव पाटील कोठावळे" (नाशिकचे मुलकी व पोलीस पाटील) उत्तर महाराष्ट्र पत्रकारिता पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
पुरस्कारामध्ये उत्तर महाराष्ट्रातील पत्रकाराचा समावेश असून नगर जिल्ह्यातून बाळासाहेब नवगिरे, श्रीकांत जाधव व संदीप गाडेकर यांचा समावेश करण्यात आला आहे.
५ जानेवारी २०२४ रोजी दुपारी ४.३० वाजता श्री कालिका मंदिर सभागृह, जुना आग्रा रोड, नाशिक येथे हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी कालिका देवी संस्थानचे अध्यक्ष केशवराव पाटील, कोषाध्यक्ष सुभाष तळाजिया, सचिव डॉ. प्रतापराव कोठावळे उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजन समितीचे अध्यक्ष अशोक दुधारे व सचिव आनंद खरे यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत