सात्रळ(वेबटिम) सोनगाव परिसरात अयोध्या येथे श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा निमित्त आलेल्या अक्षदा कलशाची येथील पंचक्रोशीत भव्य अशी शोभा ...
सात्रळ(वेबटिम)
सोनगाव परिसरात अयोध्या येथे श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा निमित्त आलेल्या अक्षदा कलशाची येथील पंचक्रोशीत भव्य अशी शोभा यात्रा काढण्यात आली.
येथील विश्व हिंदू परीषद शाखा तसेच सकल हिंदू समाज तसेच ग्रामस्थांनी या शोभा यात्रेचे आयोजन केले होते. सजविलेल्या ट्रॅक्टरट्रॉली त विराजमान असलेला अक्षदा कलश, बाल गोपालांनी केलेली प्रभू श्रीराम, सीता, लक्ष्मण, हनुमान वेष भुषा,शोभायात्रा स्वागतासाठी घरोघरीअंगणात काढलेली रांगोळी, जागोजागी होणारे अक्षदा कलश पूजन , टाळ मूदूंगाचा गजर, पुरुष महिला वारकरी चे भजन गायन, तरुणाचा राम नामाचा जयघोष अश्या उत्साह पूर्ण वातावरनात शोभायात्रा सात्रळ सोनगाव धानोरे तील प्रमुख रस्त्यावरून मार्गक्रमण करीत प्रवरा बँकेसमोर सांगता सभेत रूपांतर झाले.
सभेच्या अध्यक्ष स्थानी विश्व् हिंदू परिषद, सोनगाव मंडळाचे मा. अध्यक्ष संभाजी रामचंद्र अंत्रे होते. या प्रसंगी रा. स्व. संघांचे जेष्ठ स्वयंसेवक चारुदत्त भगत यांनी अयोध्येतील श्रीराम मंदीराची इतिहास, माहिती नमूद केली. विखे कारखान्याचे मा. संचालक पाराजी घनवट यांनी उपस्तिथ असलेल्या कारसेवकांचा परिचय करून दिला. या प्रसंगी विश्व हिंदू परिषद राहुरी तालुका अध्यक्ष अंत्रे गुरुजी, येथील बजरंग दलाचे संयोजक उमेश पन्हाळे पंढरीनाथ कडू, नारायण घनवट, रवींद्र संपतराव कडू, बबनराव कोरडे, रंगनाथ महाराज पांडे, सुभाषराव अंत्रे, रमेश पन्हाळे, बिपीन ताठे, संजय शिंदे, अंबादास दिघे, योगेश चोरमुंगे, अजित जोर्वेकर, संदीप रोकडे, विजय वाघचौरे, तसेच तिन्ही गावचे ग्रामस्थ, रा. स्व. संघांचे स्वयंसेवक,, भजनी मोठया संख्येने शोभायात्रेत सहभागी झाले होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत