राहुरी फॅक्टरी(वेबटीम) गेल्या अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र मध्ये मोठ्या संख्येने आंदोलने चालू होती याच आंदोलनाचा भाग म्ह...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
गेल्या अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र मध्ये मोठ्या संख्येने आंदोलने चालू होती याच आंदोलनाचा भाग म्हणून मराठा संघर्ष योद्धा मनोज जारंगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाला यश मिळाल्याबद्दल राहुरी फॅक्टरी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे मराठा बांधवांनी फटाके फोडत मिठाई भरवत गुलालाची उधळण करत जल्लोष केला
मनोज जरांगे पाटील याच्या आंदोलनाची घेत महाराष्ट्र सरकारने नोंदी मिळालेल्या सर्व मराठा परिवारास कुणबी प्रमाणपत्र देणे,शिंदे समिती रद्द न करता मुदत वाढ देणे,सगे सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणे आदी मागण्या मान्य केलेल्या आहेत.
याचा आनंद उत्सव राहुरी फॅक्टरी व देवळाली प्रवरा येथील मुंबईत जरांगे यांच्या आंदोलनातून राहुरी फॅक्टरी येथे परतल्यावर छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे साजरा केला
यावेळी राहुरी फॅक्टरी व देवळाली प्रवरा सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत