राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथील राहुल गणपत शिंदे यांनी परभणी जिल्हा निवड समिती जिल्हाधिकारी कार्यालय 'तलाठी सरळ सेवा पदभरती ...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
राहुरी फॅक्टरी येथील राहुल गणपत शिंदे यांनी परभणी जिल्हा निवड समिती जिल्हाधिकारी कार्यालय 'तलाठी सरळ सेवा पदभरती २०२३ मध्ये उत्तीर्ण होवून यश मिळविले आहे.
राहुल शिंदे यांनी MPSC मध्ये ४ वर्ष वर्ग अ, ब,क मिळून १४ मुख्य परिक्षा दिल्या आहेत. राज्य सेवा मुख्य परिक्षा, पोलीस उपनिरीक्षक मुख्य परिक्षा, एसआयटी मुख्य परिक्षा ,सब रजिस्टर मुख्य परिक्षा दिल्या आहे. तलाठी पदभरती २०२३ परीक्षा उत्तीर्ण होऊन यश संपादन केले आहे.
राहुरी शिंदे यांचे वडील गणपत शिंदे हे वडिल अल्पभुधारक शेतकरी असून राहुरी फॅक्टरी येथील आदर्श नागरी पतसंस्थेत पिग्मी एजंटचे काम करत आहे. त्यांचे उत्पन्न जेमतेम असल्याने मुलांच्या शिक्षणासाठी त्याचा मोठा संघर्ष करून मुलांना शिकविले. त्यातील राहुल यांना नेहमी एमपीएससी परिक्षेसाठी प्रोहत्सान दिले. राहुन यांनी त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवून प्रगतीची वाटचाल केली आहे.
सर्व सामान्य कुटुंबातील मुलगा तलाठी परिक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे राहुरी फॅक्टरी परिसरातून राहुल शिंदे यांचे अभिनंदन होत आहे. आदर्श नागरी पतसंस्थेच्यावतीने राहुल शिंदे यांचा सन्मान करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत