गणेगाव येथे विवेकानंद नर्सिंग होम ट्रस्टच्या कॉलेज ऑफ बी फार्मसीच्यावतीने राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिरास प्रारंभ - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

गणेगाव येथे विवेकानंद नर्सिंग होम ट्रस्टच्या कॉलेज ऑफ बी फार्मसीच्यावतीने राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिरास प्रारंभ

  राहुरी(वेबटीम) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे, राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि श्री विवेकानंद नर्सिंग होम ट्रस्ट, कॉलेज ऑफ बी. फार्म...

 राहुरी(वेबटीम)



सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे, राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि श्री विवेकानंद नर्सिंग होम ट्रस्ट, कॉलेज ऑफ बी. फार्मसी, श्रीशिवाजीनगर यांच्या विद्यमाने युवकांचा ध्यास, ग्राम-शहर विकास उपक्रमांतर्गत लोकसंख्या नियंत्रण जनजागृती  अंतर्गत राहुरी तालुक्यातील गणेगाव येथे विशेष श्रमसंस्कार शिबिरास उत्साहात प्रारंभ झाला आहे. 


  या शिबिराचे उद्घाटन प्राधिकृत अधिकारी तथा सहायक निबंधक दिपक पराये, अमोल भनगडे, शोभा भनगडे, संदीप कोळसे, डॉ.बाळासाहेब पागिरे, डॉ. विलास  कड, डॉ. संतोष बांगर, मच्छिद्र  गागरे  यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.  सात दिवसीय शिबिरात प्रार्थना, प्राणायम, योगासने, श्रमदान, व्याख्यान माला, शिवार फेरी, ग्रामस्थ भेट, सांस्कृतिक कार्यक्रम, भोजन आदी कार्यक्रम संपन्न होणार आहे. विविध क्षेत्रातील मान्यवर भेट देऊन मार्गदर्शन करणार आहेत.


  ३० जानेवारी रोजी या शिबिराची सांगता होणार असून शिबिर यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ.बाळासाहेब सिरस्कर, उपप्राचार्य डॉ.सतीश धोंडे, डॉ.प्रवीण ताजने,कार्तिकी पेरणे विद्यार्थी प्रतिनिधी ओंकार कोबरणे,अनुजा खंडागळे  व शिक्षकवर्ग,  शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी अथक परिश्रम घेत असून गणेगाव ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक यांचे सहकार्य लाभत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत