राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे शिवारात अवैध मुरूम उत्खनन करणाऱ्या वाहनाने दुचाकीस्वाराला जोराची धडक दिलेल्या दोन्ही ...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे शिवारात अवैध मुरूम उत्खनन करणाऱ्या वाहनाने दुचाकीस्वाराला जोराची धडक दिलेल्या दोन्ही पाय फ्रॅक्चर होऊन गंभीर जखमी झालेला तरुण अजिंक्य आदीनाथ वाणी या तरुणाचा उपचारादरम्यान आज रविवारी सकाळी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
राहुरी तालुक्यातील कणगर, चिंचविहिरे, ताहाराबाद, राहुरी कारखाना, देवळाली प्रवरा परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून अवैध मुरूम उत्खनन सुरू असल्याने सातत्याने अपघात घडत असतात.
गेल्या शनिवारी सायंकाळी चिंचविहिरे रोडवर श्रीराम मंदिर नजीक मुरूम वाहतूक करणाऱ्या वाहनाने समोरून आलेल्या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार अजिंक्य आदीनाथ वाणी(वय-२२) हा तरुण गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान आज पहाटे त्याचा मृत्यू झाला आहे.
मयत अजिंक्य वाणी यांच्यावर आज शोकाकुल वातावरणात गणेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. अजिंक्य हा वाणी सेंट्रल स्कुलचे संचालक आदीनाथ वाणणी यांचा मुलगा तर प्रा.दत्तात्रय वाणी यांच्या पुतण्या होत.
या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होऊन अवैध उत्खनन करणाऱ्या तस्करांविरुद्ध संताप व्यक्त होत आहे.
गेल्या दहा दिवसापूर्वी चिंचविहिरे येथील एका महिलेला अवैध मुरूम उत्खनन करणाऱ्या वाहनाने धडक दिली. यात सदर महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. पुन्हा अपघात घडल्याने ग्रामस्थांतून अवैध मुरूम उत्खनन करणाऱ्या विरोधात नाराजी व्यक्त केली आहे.महसूल प्रशासनाने अवैध गौण खनिज प्रश्नी तातडीने लक्ष घालावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडु असा इशारा कणगर, चिंचविहिरे, गणेगाव परिसरातील ग्रामस्थांनी दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत