राहुरी(वेबटीम) राहुरी न्यायालयात वकिली व्यवसाय करणारे दांपत्य राजाराम जयवंत आढाव व मनीषा राजाराम आढाव राहणार मानोरी हे वकील दाम्पत्य काल दिन...
राहुरी(वेबटीम)
राहुरी न्यायालयात वकिली व्यवसाय करणारे दांपत्य राजाराम जयवंत आढाव व मनीषा राजाराम आढाव राहणार मानोरी हे वकील दाम्पत्य काल दिनांक २५ जानेवारी २०२४ पासून बेपत्ता झाल्याने न्यायालय परिसरात खळबळ उडाली असून
वकील दाम्पत्याचा लवकरच शोध घ्यावा अशी मागणी आज 26 जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता राहुरी बार असोसीएनचेचे अध्यक्ष ऋषिकेश मोरे यांनी केली आहे.
याबाबत समजलेले हकीगत अशी की राहुरी न्यायालयात वकिली करणारे दांपत्य राजाराम आढाव व मनीषा राजाराम आढाव हे गुरुवारी राहुरी न्यायालयातून अहमदनगर न्यायालयात कामकाज पाहण्यासाठी जातो असे सांगून गेल्यानंतर ते पुन्हा कोणाला दिसले नाही . रात्री राहुरी पोलीस गस्त घालत असताना राहुरी न्यायालयात परिसरात एका फोर्ड फियास्टा गाडी जवळ काही अज्ञात व्यक्ती दिसले. पोलिसांची गाडी पाहतच ते एक डस्टर गाडी मधून मल्हारवाडी रोडच्या दिशेने सुसाट वेगाने पसार झाले.
पोलिसांनी ती फोर्ड फियास्टा गाडी राहुरी पोलीस स्टेशन आणली असता ती गाडी ऍडव्होकेट राजाराम जयवंत आढाव व मनीषा राजाराम आढाव यांची असल्याचे समजले.
त्या गाडी मध्ये एक रबरी हॅन्ड ग्लोज व एक शूज तसेच मोबाईलचा सिम कव्हर आढळून आले तसेच आढाव दांपत्य देखील मिळून येत नसल्याने पोलिसांनी तात्काळ त्यांचा शोध सुरु केला आहे.
वकील राजाराम आढाव व मनीषा राजाराम हे मिळून येत नसल्याचे व त्यांची गाडी पोलीस स्टेशन मध्ये असल्याचे समजताच राहुरी न्यायालयातील सर्व वकिलांनी राहुरी पोलीस स्टेशनला धाव घेतली तसेच आढाव दाम्पत्याच्या नातेवाईक व मानोरी गावातील लोकांनी देखील पोलीस स्टेशन मध्ये धाव घेतली.राहुरी पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्याचे काम सुरु होते .
वकील दाम्पत्याचा लवकरच शोध घ्यावा असे राहुरी बार असोसिएशनचे अध्यक्ष ऋषिकेश मोरे यांनी केले .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत