राहुरी फॅक्टरी(वेबटीम) मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मुंबईकडे निघालेल्या मनोज जरांगेंच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी देवळाली प्रवरा व राहुरी...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मुंबईकडे निघालेल्या मनोज जरांगेंच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी येथील मराठा समाजबांधव तरुण गुरुवारी(दि २५) रवाना झाले.
देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी येथील मराठा बांधवांनी रात्री १० वाजता राहुरी फॅक्टरी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर मुंबईकडे रवाना झाले.
यावेळी एक मराठा लाख मराठा,आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापच, कोण म्हणतंय देत नाय घेतल्याशिवाय राहत नाय आदी घोषणा देण्यात आल्या.
वसंत कदम, संतोष चोळके,मनोज कदम,गणेश रिंगे,संतोष कदम,प्रसाद कदम,सचिन कदम,संदीप कदम,मयूर मोरे,अविनाश वरखडे,कैलास सौदागर, जालिंदर दोंड, संतोष चोळके,अजय वाणी,सुधाकर आदिक बाबासाहेब खांदे आदिंसह मराठा बांधव मुंबईकडे रवाना झाले.
यावेळी देवेंद्र लांबे, सतीश घुले, हसन सय्यद, अमोल वाणी,संदीप वरखडे,संजय वाणी,हसन सय्यद,भाऊसाहेब आरंगळे,रवी कदम,रवी मुसमाडे,निशांत चव्हाण,युवराज कदम,अमोल वाळुंज, किरण सिनारे ,मनोज तांबे आदिंसह मराठा बांधव उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत