राहुरी फॅक्टरी(वेबटीम) देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाचे भाऊसाहेब पगारे यांना अहमदनगर ...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाचे भाऊसाहेब पगारे यांना अहमदनगर उत्तर व दक्षिण जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.संपूर्ण नगर जिल्ह्याची जबाबदारी पगारे यांच्याकडे सोपविल्याने कार्यकर्त्यांत समाधानाचे वातावरण पसरले आहे.
येत्या काही दिवसांवर लोकसभा निवडणूक येऊन ठेपली असून याच पार्श्वभूमीवर सर्व पक्ष आपापली तयारी करत असून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाने देखील कंबर कसली आहे. दक्षिण जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी असलेल्या पगारे यांना दक्षिण-उत्तर संपूर्ण नगर जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे.
राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांच्या आदेशानुसार राष्ट्रीय सेक्रेटरी मोहनलाल पाटील, महाराष्ट्र महिला अध्यक्षा सुनीता चव्हाण, महाराष्ट्र कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार, उपाध्यक्ष दादासाहेब ओहळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली आहे.
या निवडीप्रसंगी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत दारोळे, महाराष्ट्र संघटक कैलास जोगदंड, केंद्रीय कार्यालय प्रमुख तानाजी मिसळे, अहमदनगर जिल्हा सचिव राजन ब्राम्हणे, युवा नेते पप्पू गोडगे, किरण सुरडकर, आकाश घोडके, संजय कांबळे, सागर सुर्वे, अरविंद भालेराव, प्रशांत दवटे, सौरभ थोरात, दिनेश पांजगे, दिनेश जाधव, प्रशांत तोरणे, नितीन जाधव, प्रदीप सोनवणे आदी उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत