राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा परिसरातील तरुणाने अल्पवयीन मुलीच्या अपहरणापूर्वी तिच्यावर बलात्कार करण्यासाठी वाप...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा परिसरातील तरुणाने अल्पवयीन मुलीच्या अपहरणापूर्वी तिच्यावर बलात्कार करण्यासाठी वापरलेल्या हॉटेल तथा लॉज मालकास राहुरी पोलिसांनी अटक केली. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी राहुरीत अवैध वेश्या व्यवसाय व अल्पवयीन मुला-मुलींना लॉज वापरण्यास देणाऱ्या लॉज चालकांवर कारवाई सूरु केल्याने या कारवाईचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
देवळाली प्रवरातील शुभम राजेंद्र सत्रे याने अल्पवयीन मुलीस माझे तुझ्यावर प्रेम आहे आपण पळून जाऊन लग्न करू तू माझ्यासोबत आली नाही तर मी तुझ्या आई-वडिलांना जीवे ठार मारून टाकीन असा दम दिल्याने सदर अल्पवयीन मुलगी मोटरसायकलवर बसून गुहा येथील मैत्री हॉटेल येथे घेऊन गेला तेथील हॉटेलचालकानेही सदर अल्पवयीन मुलीच्या वयाची खातर जमा न करता सदर आरोपीस व अल्पवयीन मुलीस हॉटेलच्या खोलीमध्ये प्रवेश दिला. त्यानंतर आरोपी शुभम राजेंद्र सत्रे याने सदर अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून नंतर तीस अहमदनगर येथे मोटरसायकलने घेऊन गेला व तिथून एका चार चाकी वाहनाने अहमदनगर ते बीड या अज्ञात ठिकाणी घेऊन गेला. त्यानंतर सदर बाबत पीडितेच्या घरच्यांना माहिती मिळाल्याने पीडीतीच्या नातेवाईकांनी तिला घरी आणल्यानंतर सदर बाबत माहिती दिल्याने भारतीय दंड विधान संहितेचे कलम 363,366, 376( 2) बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम 2012 कलम 4,8,12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदर गुन्ह्यांमध्ये आरोपी शुभम राजेंद्र सत्रे अटक केली होती व त्यास पोलीस कोठडी मिळाली होती. दरम्यान सदर अल्पवयीन मुलीवर बलात्कार झालेल्या गुहा येथील हॉटेल मैत्री पार्कचा हॉटेल मालक रवींद्र योसेफ जाधव यास आज ३ फेब्रुवारी रोजी अटक केली आहे.
पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक एस आर फडोळ , लेखनिक रवींद्र कांबळे , पोशी अमोल गायकवाड यांच्या पथकाने केलेली आहे.
अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेणे तथा लैंगिक अत्याचार करणे यावर प्रतिबंध व्हावा म्हणून राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व हॉटेल चालकांना व लॉजिंग मालकांना राहुरी पोलीस स्टेशन मार्फत भारतीय दंड विधान संहिता कलम 149 अन्वये नोटीस देण्यात आलेली आहे की, कुणीही अल्पवयीन मुलींस /घेऊन येणाऱ्या व्यक्तीस हॉटेल लॉज वापरण्याकरिता तसेच सज्ञान व्यक्तींचे ओळखपत्र व मोबाईल नंबरची शहानिशा केल्याशिवाय हॉटेल लॉजिस मध्ये प्रवेश देणार नाही अन्यथा प्रचलित कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात येईल.सर्वसामान्य आव्हान करण्यात येते की अशाप्रकारे अल्पवयीन मुलींना हॉटेल लॉजिस उपलब्ध करून दिल्या जात असल्यास त्याबाबतची माहिती असल्यास आपण पोलीस स्टेशनला माहिती कळवावी. आपले नाव गोपनीय ठेवण्यात येईल असे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी म्हंटले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत