अहमदनगर आर्थिक गुन्हे शाखेच्या डीवायएसपीपदी संदीप मिटके - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

अहमदनगर आर्थिक गुन्हे शाखेच्या डीवायएसपीपदी संदीप मिटके

अहमदनगर( प्रतिनिधी)  शिर्डी उपविभागाचे Dysp  संदीप मिटके यांची काही दिवसांपूर्वी शासनाने काढलेल्या बदली आदेशाने त्यांची शिर्डी ते नाशिक शहर ...

अहमदनगर( प्रतिनिधी) 



शिर्डी उपविभागाचे Dysp  संदीप मिटके यांची काही दिवसांपूर्वी शासनाने काढलेल्या बदली आदेशाने त्यांची शिर्डी ते नाशिक शहर सहायक पोलीस आयुक्त म्हणून बदली झाली होती. आज  त्यांची अहमदनगर येथील आर्थिक गुन्हे शाखेत Dysp पदी बदलीचे आदेश शासनाने निर्गमित केले आहेत.

     अहमदनगर शहर, श्रीरामपूर तसेच शिर्डी येथे त्यांनी यापूर्वी काम पाहिलेले आहे नगर  जिल्ह्यातील अनेक गुन्ह्यांचा तपास तसेच नगर शहरातील महत्त्वाचा मानला जाणारा मोहरम बंदोबस्त, गणेशोत्सव, त्यांनी चोखपणे पार पाडलेला आहे. श्रीरामपूर येथे असताना दिग्रस येथील गोळीबार घटनेची परीस्थिती अत्यंत कुशलतेने त्यांनी हाताळली, तसेच जिल्ह्यात  विविध ठिकाणी वेश्याव्यवसाय चालणाऱ्या ठिकाणी छापा टाकून अनेक पीडितांची सुटका त्यांनी केली असून श्रीरामपूरातील मुल्ला कटर टोळी विरुद्ध मोक्का लावून त्यांचा कायमचा बंदोबस्त करण्यात आला अरे त्यांचे नगर जिल्ह्यातील काम हे उल्लेखनीय ठरलेले आहे.

     Dysp संदीप मिटके यांच्या आर्थिक गुन्हे शाखेतील बदलीने जिल्ह्यातून सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत