राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील पुर्व भागातील वैद्यकीय क्षेञात एक उज्वल नाव असलेल्या मानोरी येथील "सिंधु" हाॅस्पिटल येथे ...
राहुरी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील पुर्व भागातील वैद्यकीय क्षेञात एक उज्वल नाव असलेल्या मानोरी येथील "सिंधु" हाॅस्पिटल येथे आत्याधुनिक एक्स-रे मशीनचा शुभारंभ नुकताच संपन्न झाला आहे. संभाजी राजे युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजुभाऊ शेटे यांच्या शुभहस्ते हा सोहळा पार पडला आहे.
मानोरी येथील डॉ.अजिंक्य पोपटराव आढाव यांच्या सिंधू हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या सेवेकरिता या एक्स-रे मशीन चा शुभारंभ करण्यात आला आहे. सर्व प्रकारचे आत्याधुनिक (डिजीटल) एक्स-रे यामाध्यमातून होणार असुन रूग्णांच्या सोयीसुविधेसाठी २४ तास उपलब्ध असणार असल्याची माहीती डाॅ.अजिंक्य आढाव यांनी दिली.
प्रसंगी सरपंच भाऊराव वाघ, कचरुनाना आढाव, उत्तमराव आढाव, निवृत्ती नाना आढाव, संभुगिरी महाराज गोसावी, संदीप आढाव, शामराव आढाव, बाळासाहेब आढाव, पोपट पोटे, गोरखनाथ गुंड, गणेश खुळे, मनोज खुळे, अप्पासाहेब आढाव, कोहकडे ,पोपट आढाव, के.बी. शेख, अशोक कोहकडे, किरण आढाव, बंटी आढाव , अभिजित कोहकडे , साहिल पठाण आदी मान्यवर उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत