राहुरी(वेबटीम) नगर जिल्ह्यातील अग्रगण्य ठरलेल्या साई आदर्श मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुख्य कार्यालयाचा वर्धापन दिन श...
राहुरी(वेबटीम)
नगर जिल्ह्यातील अग्रगण्य ठरलेल्या साई आदर्श मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुख्य कार्यालयाचा वर्धापन दिन शुक्रवार दिनांक १ मार्च रोजी संपन्न होत आहे. या निमित्ताने सुप्रसिद्ध व्याख्याते अविनाश भारती यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले असल्याची माहिती अध्यक्ष शिवाजीराव कपाळे यांनी दिली.
याबाबत कपाळे यांनी माहिती देताना सांगितले की, साई आदर्श मल्टीस्टेटच्या प्रेरणादायी ११ व्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवारी दि. १ मार्च रोजी संध्याकाळी ६ वाजता पोलीस उपअधीक्षक बसवराज शिवपुजे, श्रीरामपूरचे प्रांताधिकारी किरण सावंत, राहुरीचे तहसीलदार नामदेवराव पाटील, राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, राहुल शिंदे, साक्षी कोळसे, पार्श्वगायक जयेश खरे यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
त्यानंतर महाराष्ट्रातील प्रेरणादायी व्याख्याते अविनाश भारती यांचे “ जगुया आनंदाने ” या विषयावर व्याख्यान होणार आहे त्यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमास ठेविदार, सभासद, खातेदार, हितचिंतक, मित्रपरिवार, ग्रामस्थांनी उपस्थित राहावे असे आवाहन कपाळे व संचालक मंडळाने केले आहे.
तसेच शनिवार दिनांक 2 मार्च रोजी सकाळी १० साई आदर्श मल्टीस्टेट व बुधराणी हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने सकाळी १० ते २ वाजेपर्यंत मोफत नेत्र शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरात आवश्यक असणाऱ्या व्यक्तींना मोफत चष्मा वाटप तसेच त्यांना शस्त्रक्रियेसाठी पुण्याला नेले जाणार आहे सदर शस्रक्रिया मोफत केली जाणार असून त्यांना जाण्या येण्याचा व भोजनाचा खर्च साई आदर्शच्या वतीने केला जाणार आहे. गरजूंनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन साई आदर्श मल्टीस्टेटच्या संचालक मंडळाने केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत