राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथील बैलगाडी यार्ड येथील म्हसोबा महाराज यात्रा उत्सव शनिवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. खंडोबा मह...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
राहुरी फॅक्टरी येथील बैलगाडी यार्ड येथील म्हसोबा महाराज यात्रा उत्सव शनिवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
खंडोबा महाराज यात्रा उत्सवानिमित्त म्हसोबा महाराज मंदिरात दरवर्षी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.
शनिवारी सकाळी विधिवत गंगाजल पूजन त्यानंतर हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. रात्री पार पडलेल्या छबिना मिरवणुकीत डीजेच्या निनादात तरुणाईची पावले थिरकली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी गणपती चौक मित्र मंडळ व परिसरातील ग्रामस्थ यांनी अथक परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत