राहुरी(प्रतिनिधी) आयोध्यात राम लल्लांची प्राणप्रतिष्ठा झाली हा दिवस जीवनातील एक अनमोल क्षण होता. या क्षणाचा आनंद जितका हिंदु ...
राहुरी(प्रतिनिधी)
आयोध्यात राम लल्लांची प्राणप्रतिष्ठा झाली हा दिवस जीवनातील एक अनमोल क्षण होता. या क्षणाचा आनंद जितका हिंदु बांधवांना झाला तितकाच आनंद मुस्लिम बांधवांना देखील झाला आहे कारण त्यांचे वंशज देखील "राम लल्लाच" आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अन् उत्तर प्रदेशचे मुख्यमंञी योगी आदित्यनाथ यांच्या उत्तम मार्गदर्शनाने हा सोहळा पार पडला. "उत्तर" प्रदेशचे नव्हे तर "उत्तम" प्रदेशचे ते मुख्यमंञी आहेत. भविष्यात मोदी यांच्यात मार्गदर्शनात योगी आदिनाथ हे पंतप्रधान होतील असे गौरवोद्गार ताडकेश्वर गडाचे मठाधिपती शांतीब्रम्ह अदिनाथ महाराज शास्री यांनी काढले आहे. ते आरडगाव येथील सप्ताहात काल्याच्या कीर्तन प्रसंगी बोलत होते.
आरडगाव (ता.राहुरी) येथे ह.भ.प.नामदेव महाराज शास्री, मनोज महाराज वाकडे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा (वर्ष ६०) सुरू होता. याठिकाणी गेल्या सात दिवसांपासून मोठ्या भक्तिमय वातावरणात धार्मिक सोहळा पार पडला. आज सकाळी ताडकेश्वर गडाचे मठाधिपती महतं शांतीब्रम्ह अदिनाथ महाराज शास्री यांचे काल्याचे किर्तन संपन्न झाले. महाराज बोलताना म्हणाले की, राम मदिरासाठी लाखों राम भक्तांचे बलिदान आहे. त्यांचे बलिदान गेले पण त्यांना मंदिर बघायला मिळाले नाही.पण आपण भाग्यवान आहोत की,आपल्याला हे राम मंदिर बघायला मिळाले आहे. खर तर यामधे भारत भरातील प्रतेक भाविकाचे सहकार्य लाभले आहे. आता हे मंदिर बघितलं की मनाला समाधान वाटतं. माञ या मंदिरासाठी ज्यांनी बलिदान दिले या मंदिराच्या पायात त्यांचे रक्त आहे अन् त्याच्यावरच हे मंदिर उभा असुन पहिली पायरी त्यांची आहे.देव अवतार घेतात ते जगाच्या कल्याणासाठी तर संत अवतार घेतात जिवन माञांच्या कल्याणासाठी. माञ संताच्या सेवेपुढे अन् भावापुढे देवालाही लहान व्हावे लागते.म्हणून भगवतांची निस्वार्थ सेवा करत रहावी.
या किर्तन सेवेला ह.भ.प.महेश महाराज खाटेकर, किशोर महाराज शेळके, सुनिल महाराज पारे, विलास महाराज कोतकर, गणेश महाराज सजगुरे, शुभम महाराज भांड,बाळासाहेब महाराज गोसावी, राजु महाराज आढाव आदिंची साथ संगत लाभली. शेवटी महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत