आरपीआय आंबेडकर गटाच्या विद्यार्थी सेनेच्या तालुकाध्यक्षपदी आशिष सांगळे यांचे निवड - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

आरपीआय आंबेडकर गटाच्या विद्यार्थी सेनेच्या तालुकाध्यक्षपदी आशिष सांगळे यांचे निवड

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाच्या वतीने जिल्हाभर पदाधिकारी निवडी व पक्ष वाढवण्याचे काम जोरात सुरू असून विद्...

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाच्या वतीने जिल्हाभर पदाधिकारी निवडी व पक्ष वाढवण्याचे काम जोरात सुरू असून विद्यार्थ्यांच्या एकीसाठी व विद्यार्थ्यांच्या शालेय महाविद्यालयीन अडचणी समजावून घेण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाने विद्यार्थी सेना राहुरी तालुका यांची निवड करण्यात आली असून राहुरी तालुक्याच्या विद्यार्थ्यांचे तालुका अध्यक्षपदी राहुरी फॅक्टरी येथील आशिष सांगळे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.

जिल्हाअध्यक्ष भाऊसाहेब पगारे यांच्या हस्ते हे निवडीचे पत्र त्यांना प्रदान करण्यात आले.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली आरपीआय आंबेडकर गट मोठ्या प्रमाणात पक्ष वाढवण्याचे काम जोमात सुरू असून आज विद्यार्थी सेनेच्या तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी सांगळे यांच्यावर देण्यात आली.

 यावेळी जिल्हा सचिव राजन ब्राह्मणे,तालुकाध्यक्ष शाम जाधव,युवक तालुकाध्यक्ष प्रतीक खरात, सनी जगताप आदींसह भीमसैनिक उपस्थित होते.

सांगळे यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत