श्रीरामपूर(संदीप पाळंदे) स्वच्छता पखवाडा अंतर्गत पीएम श्री नगरपालिका शाळा क्र. ७ येथे नगरपालिका स्वच्छतादूतांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्र...
श्रीरामपूर(संदीप पाळंदे)
स्वच्छता पखवाडा अंतर्गत पीएम श्री नगरपालिका शाळा क्र. ७ येथे नगरपालिका स्वच्छतादूतांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी रमजान खान पठाण हे होते. त्यांच्या हस्ते वॉर्ड क्रमांक ७ मधील स्वच्छता कर्मचार्यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. शहर व पर्यायाने आपली वसुंधरा स्वच्छ व सुंदर ठेवण्याचे सत्कर्म हे कर्मचारी मनोभावे करत असल्याने त्यांच्या या ऋणातून मुक्त होण्याचा एक छोटासा प्रयत्न म्हणुन व विद्यार्थ्यांमधे कोणतेही काम लहान मोठे नसते ही भावना रुजविण्यासाठी सदर कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याचे शाळेचे सहशिक्षक प्रशांत पठाडे यानी सांगितले. तर मुख्याध्यापिका कल्पना जगताप यांनी शाळा केंद्र शासनाच्या पीएम श्री योजनेतून विविध उपक्रम राबवून कशाप्रकारे कात टाकत आहे असे प्रास्ताविकात सांगितले.
प्रशासनाधिकारी रमजानखान पठाण साहेब यानी सर्व कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक केले. नगरपालिका शिक्षण मंडळातील किशोर त्रिभुवन यांनी सर्व स्वच्छता कर्मचारी कशाप्रकारे रोगराई कमी करण्यास आपल्याला सहाय्य करतात ते आपल्या मनोगतात सांगितले. याप्रसंगी स्वच्छतादूत विजय गायकवाड, विकास भिंगारे, अनिल शिंगारे, अभिषेक कांबळे, राजू प्रधान, शकुंतला भोजने, लक्ष्मी रील, शकुंतला हिवाळे, उषा चव्हाण, रुपेश परोसिया, माहेश्वरी चव्हाण यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सुनीता मोरगे, आशा पोपळघट, सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, नगरपालिका शाळा क्रमांक ४ चे मुख्याध्यापक फारुक शहा, माजी मुख्याध्यापिका रजनी कर्डिले, डॉ. बा.ग.कल्याणकर रात्र शाळेचे मुख्याध्यापक राजेश कांबळे, सचिन शिंदे, शरद नागरगोजे आदी मान्यवर उपस्थित होते. शाळेच्या उपाध्यापिका वर्षा वाकचौरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत