राहुरी(प्रतिनिधी) चार-चार पातशाह्या सभोवताली धुमाकूळ घालीत असताना केवळ उत्तम नियोजनाच्या बळावर स्वराज्य उभे करणे व ते टिकवणे हे अतुलनीय कार्...
राहुरी(प्रतिनिधी)
चार-चार पातशाह्या सभोवताली धुमाकूळ घालीत असताना केवळ उत्तम नियोजनाच्या बळावर स्वराज्य उभे करणे व ते टिकवणे हे अतुलनीय कार्य शिवरायांनी करून आपल्या पाठिचा कणा ताठ केलाय,आज आपण ते विसरत चाललो आहे, असे प्रतिपादन युवाव्याख्याते प्रथमेश वर्धावे यांनी केले.
राहुरी तालुक्यातील ब्राम्हणगाव भांड ग्रामस्थ आयोजित भव्य शिवजयंती उत्सवव ब्रम्हगिरी महाराज महाआरती वर्धापनदिना निमित्त आयोजित व्याख्यानाते ते बोलत होते.
यावेळी प्रथमेश वर्धावे यांनी शिवकालीनकाळ उलगडताना लढायांसोबत शिवरायांनी केलेले सामाजिक कार्य व त्याचे समाज घटकांवर झालेले परिणामही विषद केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुरी कारखान्याचे माजी संचालक रमेश वारुळे सर यांनी केले .तसेच आभार सांगता ॲड .इंद्रभान काळे पाटील यांनी मानले .या वेळी माजी सरपंच डॉ .वारुळे ,गोसावी गुरुजी ,एकनाथ काळे , पोपटराव भांड ,बापूसाहेब काळे, विलास काळे ,सुनील देवकर ,संजय काळे ,गौतम गायकवाड ,राजेंद्र साळवे,,ग्रामपंचायत सरपंच ,उपसरपंच ,सदस्य तसेच ब्राम्हणगाव भांड सोसायटीचे चेरमन, व्हा चेअरमन व सर्व सदस्य यांच्यासह अनेक मान्यवर ,महिलामंडळ ,तरुण मुले तसेच कार्यक्रमाचे आयोजक प्रमोद मुसमाडे , प्रकाश काळे,किरण काळे ,विकास भांड , सचिन काळे,अभिषेक काळे, गणेश काळे ,प्रशांत काळे,श्रीकांत काळे,अमोल काळे,प्रतीक काळे,आदित्य काळे,अनिकेत काळे,निखिल काळे ,किरण वारुळे ,संजय वारुळे ,योगेश काळे ,संकेत साळवे ,संकेत माळी, रामेश्वर काळे ,सुजित काळे ,जितू भांड पप्पू वारुळे , दिलीप काळे , पाराजी काळे आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत