मुंबईतील महामेळाव्यासाठी जिल्ह्यातून हजारो शिक्षक जाणार - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

मुंबईतील महामेळाव्यासाठी जिल्ह्यातून हजारो शिक्षक जाणार

श्रीरामपूर(वेबटीम)  राज्य सरकारने ६५ हजार प्राथमिक  शाळा उद्योगपतींना दत्तक देण्याच्या निर्णयाच्या विरोधात, कमी पटाच्या १४ हजार आठशे शाळा बं...

श्रीरामपूर(वेबटीम)



 राज्य सरकारने ६५ हजार प्राथमिक  शाळा उद्योगपतींना दत्तक देण्याच्या निर्णयाच्या विरोधात, कमी पटाच्या १४ हजार आठशे शाळा बंद करण्याच्या निर्णयाच्या विरोधात, सर्व शिक्षकांसह राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी या मागणीसाठी रविवारी (दि. २५) मुंबई येथे शाळा वाचवा, शिक्षण वाचवा, शिक्षक वाचवा अभियानांतर्गत शिक्षण, पेन्शन, आरक्षण वाचविण्यासाठी सरकारी धोरणाच्या निषेधार्थ राज्यस्तरीय महामेळाव्याचे आयोजन केलेलं आहे. या मेळाव्याचे नियोजन करण्यासाठी नुकतीच शिक्षण-पेन्शन-आरक्षण हक्क कृती समिती अहमदनगर जिल्हा बैठक संपन्न झाली.

 या महामेळाव्यास चे उद्घाटन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्रजी पवार करणार असून मेळाव्याची अध्यक्षता बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम हे करणार आहेत. या मेळाव्यास महाराष्ट्रातील सर्व शिक्षक आमदार उपस्थित राहणार आहेत. अहमदनगर जिल्ह्यामध्ये या महामेळाव्याच्या तयारीसाठी जिल्हास्तरीय शिक्षण-पेन्शन-आरक्षण हक्क कृती समितीची बैठक संपन्न झाली. यावेळी संपूर्ण जिल्हाभरातून हजारो शिक्षक बांधव मेळाव्यासाठी जातील असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

यावेळी प्रोटान शिक्षक संघटनेचे राज्य सरचिटणीस रमेश मकासरे, बहुजन मंडळाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ व्यवहारे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ संभाजीराव थोरात गटाचे प्रवीण दादा ठुबे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शिवाजीराव पाटील गटाचे प्रकाश नांगरे, जुनी पेन्शन हक्क संघटनेचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब गाढवे, शिक्षक बँकेचे माजी उपाध्यक्ष नानासाहेब बडाख, उर्दू शिक्षक संघटनेचे तौसिफ़ सय्यद,  माध्यमिक शिक्षक संघटनेचे श्री. अकोलकर, रमेश पगारे, बामसेफचे डॉ. भास्कर रणनवरे, सचिन ढगे, संतोष रोकडे, बाबासाहेब थोरात, इंजि. संजय शिंदे इत्यादी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत