नेवासा(वेबटीम) नेवासा तालुक्यातील देडगाव- तेलकुडगाव रस्त्यावर घातपात व अथवा चोरी करण्याच्या उद्देशाने असलेल्या दो घांना नेवासा पोलिसांनी ज...
नेवासा(वेबटीम)
नेवासा तालुक्यातील देडगाव- तेलकुडगाव रस्त्यावर घातपात व अथवा चोरी करण्याच्या उद्देशाने असलेल्या दोघांना नेवासा पोलिसांनी जेरबंद केले असून या वेळी देशी बनावटीच्या पिस्तूल पोलिसांनी जप्त केले आहे.पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही धडाकेबाज कारवाई केली.
पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांना मिळालेल्या माहितीनुसार देडगाव व तेलकुडगाव रस्त्यावर चोरी किंवा घातपात करण्याच्या उद्देशाने देशी गावठी कट्ट्यासह आरोपी असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार जाधव यांनी पथक तयार करून छापा टाकला असता जेऊर हैबती येथील विठ्ठल ज्ञानेश्वर तुपे(वय-२६) व सुनील दिलीप चव्हाण याला देशी बनावटीच्या पिस्तूलासह दुचाकीसह अटक करण्यात आली. याबाबत नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक घुगे हे करीत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत