देवळाली प्रवरा(वेबटीम) राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील सोसायटी डेपो येथे छत्रपती शासन ग्रुप, विघ्नहर्ता प्रतिष्ठान सकल हिंदू समाज ...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील सोसायटी डेपो येथे छत्रपती शासन ग्रुप, विघ्नहर्ता प्रतिष्ठान सकल हिंदू समाज यांच्यावतीने आज १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
प्रारंभी सकाळी सोसायटी डेपो चौकात युवा नेते राजू शेटे यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. यावेळी चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड, संदीप आढाव, वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष संतोष चोळके, शहराध्यक्ष साईनाथ बर्डे, योगेश सिनारे आदी उपस्थित होते.
सायंकाळी देवळाली प्रवरा माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम, पोलिस हेडकोन्स्टेबल विष्णू आहेर, भाजप शहराध्यक्ष अजित चव्हाण, व्यापारी संघटना अध्यक्ष सतीश वाळूंज, कार्याध्यक्ष विश्वास पाटील, माजी नगरसेवक सचिन ढुस, देवळाली सोसायटी माजी चेअरमन संतोष चव्हाण,आप्पासाहेब चव्हाण, संदीप कदम, अभिजित कदम, सुभाष पठारे, अतुल कदम, अनिल चव्हाण व साई प्रतिष्ठान सदस्य यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आरती करण्यात आली.
यावेळी रोहित कदम, गौरव मुसमाडे, राहुल गुलदगड, ऋषि परदेशी, ऋषि ढुस, प्रतिक कदम,सचिन निकम, युवराज मुसमाडे, संतोष वाळुंज,आकाश सिनारे,भुषण टिक्कल, श्रेयश मुसमाडे, नंदन शेटे, यशराज शिंदे,मयुर मोढवे, रवीकिरण ढुस,मयुर राऊत,प्रशांत ढुस,निलेश कानडे,प्रतिक वाळुंज,प्रसाद ढुस,यश कोळसे आदिंसह छत्रपती शासन ग्रुप, विघ्नहर्ता प्रतिष्ठान सदस्य व सकल हिंदू समाज बांधव उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत