पानेगांव - (वार्ताहर) नेवासे तालुक्यातील पानेगांव येथे ३९४ शिवजयंती मोठ्या उत्साहात पार पडली. सोनई पोलीस ठाण्याचे सपोनि अशिश शेळके यांचा हस...
पानेगांव - (वार्ताहर)
नेवासे तालुक्यातील पानेगांव येथे ३९४ शिवजयंती मोठ्या उत्साहात पार पडली. सोनई पोलीस ठाण्याचे सपोनि अशिश शेळके यांचा हस्ते भव्यदिव्य असणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हार नारळ वाढवून पूजन करण्यात आले या निमित्ताने युवकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. सुरुवातीला जेष्ठ नागरिक सुर्यभान गुडधे यांचा हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांचीआरती करण्यात आली.
जिवनात यशस्वी होण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार अंगिकारा १००%यश तर नक्कीच मिळणार लोकशाहीमध्ये चांगला माणूस म्हणून जगण्याचा आनंद हि मिळेल. त्याच बरोबर युवकांनी शिक्षणाचा पाया भक्कम केला पाहिजे स्पर्धेचा युगात झोकून काम केलं तर प्रशासनात काम करण्याची संधी उपलब्ध होईल. आपल्या स्वतःच्या जिवनात आमुलाग्र बदल घडल्या शिवाय राहणार नाही.शिवरायांनी सर्व समाजाला बरोबर घेवून स्वराज्याची स्थापना केली.आजहि प्रत्येकाचा हृदयात छत्रपतींना स्थान आहे. पानेगांवचा विविध विकासकामांचे कौतुक शेळके यांनी करुन नुतन ग्रामपंचायत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा त्याच बरोबर भक्त निवास काम बघून आनंद वाटला असे शेळके यांनी सांगितले.प्रत्येक सामाजिक धार्मिक कामात मी उपस्थित राहील.
माजी लोकनियुक्त सरपंच संजय पाटील जंगले माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख तसेच लोकनेते सुनिलभाऊ गडाख यांनी गावच्या विकासासाठी भरघोस निधी दिल्याने शक्य झालं असल्याचं सांगितलं.तालुकाभरातून शिवप्रेमी भक्तांनी सकाळ पासून गर्दी केली. छावा संघटनेचे अध्यक्ष सुभाष जंगले,माजी लोकनियुक्त सरपंच संजय जंगले, सरपंच निकीता भोसले, उपसरपंच दत्तात्रय घोलप, ग्रामविकास अधिकारी गणेश पाखरे, मंडलअधिकारी प्रशांत कांबळे,मुळाचे संचालक रंगनाथ जंगले, राजेंद्र जंगले, साहेबराव जंगले, भाऊसाहेब वाघ संजय पवार सुनिल भवार नामदेव शेलार माजी उपसरपंच रामराजे जंगले, विशाल जंगले, शिवशक्तीचे अध्यक्ष सुरज जंगले, बाबाराजे गुडधे, गणेश चिंधे माजी सरपंच हौशाबापू जंगले,पाराजी गुडधे, शिवस्मारक समितीचे अध्यक्ष किशोर जंगले, छत्रपती प्रतिष्ठानचे हितेश जंगले ,गुड्डू जंगले,शुभम जंगले, विजय कापसे, गणेश जंगले, जनार्दन गागरे, चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष अनिल जंगले, बाळासाहेब कल्हापूरे अशोक गागरे शिवाजी जंगले, रोहिदास चिंधे, नवनाथ जंगले बाबासाहेब शेंडगे, सुनिल जंगले, सतिश जंगले संदिप जंगले सुजित नवगिरे, कडूबाळ काकडे, भाऊसाहेब काकडे,रघूनाथ जंगले,भारत जंगले बबन जंगले, सुभाष गुडधे,आदींसह शिवप्रेमी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत