सात्रळ(वेबटीम) हींदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची394वी जयंती शिवमय वातावरणात साजरी करण्यात आली. महाराष्ट्रात छत्रपती शिव...
सात्रळ(वेबटीम)
हींदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची394वी जयंती शिवमय वातावरणात साजरी करण्यात आली. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज जयंती एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते.. या दिवशी अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आणि मिरवणुकीचे आयोजन केले जाते.
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा उत्सव इतिहासातील माहिती नुसार, १८७० साली छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्याची सुरुवात क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुण्यात केली. पुण्यापासून १०० किमी अंतरावर असलेल्या रायगडावर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली. नंतर लोकमान्य टिळकांनी जयंती साजरी करण्याची परंपरा पुढे नेली. छत्रपती शिवाजी महाराजचे शौर्य आणि योगदान जनतेला नेहमीच प्रेरणा देत राहो, यासाठी दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराजची जयंती साजरी केली जातेयेथील शिवजयंती मोहात्सवास छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे मान्यवरांचे हस्ते पूजन करून सुरुवात झाली.याप्रसंगी बालगोपालांनी तसेच युवा वक्त्यांनी पोवाडे, महाराजांची शिकवण आदी विषयांवर सादरीकरण केले. सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची भव्य दिव्य अशी मिरवणूक होणार आहे.
या वर्षीच्या शिवाजी महाराजांची ३९४ वी जयंती असल्या कारणाने “राजलक्ष्मीं अग्रोटेक नर्सरी सात्रळ” मार्फत जयंती उत्सव ठिकाणी ३९४ आंबा रोपांचे वाटप करण्यात आले आहे , विशेष म्हणजे मध्य प्रदेश येथील आदिवासी बांधवांकडून गोळा केलेल्या दुर्मिळ अश्या गावरान जंगली आंबा बीजा पासून ही रोपे केलेली आहेत,जेने करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने आपण गावरान वृक्ष लागवड, वृक्ष जपवणुक व संवर्धन करण्यासाठी एक नवीन पाऊल उचलून वृक्ष संवर्धन करण्याचा संदेश याठिकाणी दिला आहे,कार्यक्रमास परिसरातील..विविध संस्थांचे प्रमुख,सर्वाधर्मीय शिवप्रेमी, तरुण वर्ग तसेच भगव्या वेषातली बालगोपाल मोठया संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत