आंबी(संदीप पाळंदे) राहुरी तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाच्या असलेल्या अंमळनेर विकास सेवा संस्थेच्या चेअरमनपदी अच्युतराव वसंतराव जाधव तर...
आंबी(संदीप पाळंदे)
राहुरी तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाच्या असलेल्या अंमळनेर विकास सेवा संस्थेच्या चेअरमनपदी अच्युतराव वसंतराव जाधव तर,व्हाईस चेअरमनपदी रमेश उद्धवराव कोळसे यांची संचालक मंडळाच्या बैठकीत नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक मार्गदर्शक, राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा.संचालक वसंतराव कोळसे हे होते.
यावेळी संस्थचे जेष्ठ संचालक बापूराव जाधव, बी.एल्.साळुंके, बाळासाहेब ल.साळुंके, सुनिल औताडे, माजी चेअरमन किरणतात्या कोळसे, राहुल डुकरे, योगेश डुकरे, संजय कोळसे सर, भगवान जाधव, पंढरीनाथ जाधव, नारायण जाधव, संस्थेचे सचिव गिताराम काळे, निमसे भाऊसाहेब, शिवाजी रोडे यांचेसह आदि सभासद, ग्रामस्थ उपस्थीत होते. निवडणुक अधिकारी म्हणून एस.एस.शेख यांनी काम पाहीले. या नूतन पदाधिकारी यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत