शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी चोरी करणारी टोळी जेरबंद - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी चोरी करणारी टोळी जेरबंद

राहुरी(प्रतिनिधी) शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रीक मोटार चोरी करणारी टोळी राहुरी पोलीसांनी जेरबंद केली असून देवळाली प्रवरा, आंबी, सडे व वांबोरी येथी...

राहुरी(प्रतिनिधी)



शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रीक मोटार चोरी करणारी टोळी राहुरी पोलीसांनी जेरबंद केली असून देवळाली प्रवरा, आंबी, सडे व वांबोरी येथील चौघांना राहुरी पोलिसांनी जेरबंद केले आहे.


राहुरी तालुक्यात ठिकठिकाणी शेतकऱ्यांच्या विद्यूत मोटारी  चोरी करणारे १)संतोय सुरेश गोलवड वय १९ रा. सडे ता राहुरी, २) नवनाथ बाबासाहेब पवार वय २४ रा.सडे महादेव वाडी, ३) सार्थक आण्णासाहेब वांडेकर वय १९ रा. पागीरे वस्ती वांबोरी, ४) अभिजीत भागवत कोळसे वय ३२ रा. आंबी ता राहुरी, ५) मयुर भास्कर उंडे वय ३० रा. देवळाली प्रवरा ता राहुरी, यांना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आले आहे. 


या आरोपी कडे अधिक विचारपुस व चौकशी करीता त्यांनी ९ मोटारी मौजे. सडे, महादेव वाडी, उंबरे व कॅनाल परीसरातून चोरी केल्याची कबुली दिली आहे. 

  


सदरची कारवाई श्री संजय आर.ठेंगे पोलीस निरीक्षक राहुरी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली श्री गणेश चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक, श्री चारूदत्त खोंडे पोलीस उपनिरीक्षक, श्री समाधान फडोळ पोलीस उपनिरीक्षक व सफौ एकनाथ आव्हाड, पोहेको/ विकास साळवे, पोहेकों सुरज गायकवाड, पोहेकों राहुल यादव, पोना/ प्रविण बागुल, पोना/प्रविण अहिरे, पोकों/प्रमोद ढाकणे, पोकों/नदीम शेख, पोकों/ शिरसाठ, पोकॉ सचिन ताजणे, पोको सम्राट गायकवाड, पोकों/अमोल गायकवाड, मोबाईल सेल श्रीरामपुर चे पोना/सथिन धनाड, पोना/संतोष दरेकर, पोहकों/अशोक शिदे, पोकों/ अजिनाथ पाखरे, पोकों/ रोहकले, चापोहेका/शकुर सय्यद यांनी केलेली आहे. सदर गुन्हाचा पुढील तपास श्री गणेश चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुरी लेखनिक पोकों/ संतोष राठोड पो.स्टे. हे करत आहेत. 



 अनावधानाने आपण जुनी इलेक्ट्रीक मोटार कुणाकडुन विना पावती विकत घेतली असेल तर ती चोरीची असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याबाबत राहुरी पोलीस स्टेशन येथे माहीती दयावी. आपले नाव गोपनीय ठेवले जाईल.  तसेच सर्व शेतकरी बंधु यांनी जुन्या मोटार विकत घेताना सदर मोटर चोरीची नसल्याबाबत  मोटर चे ओरिजनल बिल प्राप्त करून बिलावर नमूद दुकानदार यांचेशी संपर्क साधून सदर मोटर चोरीची नसल्याबाबत खात्री करावी व कमी पैशेत मिळणा-या मोटरपंप चे प्रलोभणास बळी पडु नये असे आवाहन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी केले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत