राहुरी(वेबटीम) जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून नगर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याचसाठी नवीन चारचाकी वाहने देण्यात आले असून राहुरी पोलीस...
राहुरी(वेबटीम)
जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून नगर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याचसाठी नवीन चारचाकी वाहने देण्यात आले असून राहुरी पोलीस ठाण्यास सदर चारचाकी वाहन आज उपलब्ध झाले आहे.पोलीस ठाणे आवारात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थित वाहनाची पूजा संपन्न झाली.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने पोलीस दलासाठी ४ कोटी ६० लक्ष रुपये खर्चून ४६ चारचाकी व ४३ दुचाकी वाहने उपलब्ध करून देण्यात आली असून राहुरी पोलीस ठाण्याला एक चारचाकी वाहन मिळाले असून या वाहनाची पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र लोखंडे, सहायक पोलिस निरीक्षक गणेश चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील, पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ, पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील आदिंसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक संजय ठेंगे म्हणाले की, राहुरी पोलीस ठाण्यास दिलेल्या वाहनांचा उपयोग सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी केला जाणार असून आधिक प्रभावीपणे काम करून राहुरी तालुक्यातील गुन्हेगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत