राहुरी फॅक्टरी(वेबटीम) दहा महिन्यांपूर्वी आपले गाव व घर सोडून आलेल्या मनोरुग्ण व्यक्ती राहुरी फॅक्टरी परिसरात अली असता वैष्णवी चौक येथील भैय...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
दहा महिन्यांपूर्वी आपले गाव व घर सोडून आलेल्या मनोरुग्ण व्यक्ती राहुरी फॅक्टरी परिसरात अली असता वैष्णवी चौक येथील भैय्या थोरात या तरुणाने सदर मनोरुग्णला आपलुकीने जवळ घेऊन त्याची दाढी कटिंग करून , स्नान घालून, शभ्र कपडे घालून रूप बदलले आणि त्या मनोरुग्ण व्यक्तिच्या नातेवाईकांना संपर्क करून त्यांना राहुरीत बोलावून त्यांच्या स्वाधीन केले आहे. याकामी टायगर ग्रुपचे पदाधिकारी व पोलिसांचे सहकार्य लाभले आहे.
१ मार्च रोजी रोजी दुपारी चार वाजता वैष्णवी चौक राहुरी फॅक्टरी येथे एक पुरुषमनोरुग्ण फिरत असताना टायगर ग्रुप राहुरी तालुका प्रमुख पै.प्रथेमश (भैय्या) थोरात यांनी त्या सदर व्यक्तीस विचारले की आपण कुठले आहात, कोणत्या ठिकाणावरून आलात, आपले गाव कोणते. तर त्या व्यक्तीने माझे नाव मारुती चंद्रभान जगताप (वयवर्ष ५४)आहे व मी वालवड गाव, भूम तालुका,धाराशिव जिल्ह्यातील आहे असे सांगितले.
त्या व्यक्तीला ताबडतोब भैय्या थोरात व सदस्यांनी आपल्या ताब्यात घेतले व त्याचे डोकी दाढी करून स्नान घातले व भोजन दिले. त्यानंतर संध्याकाळच्या सुमारास ग्रुपच्या सदस्यांनी त्यांना राहुरी पोलिस ठाणे येथे दाखल केले व सगळा घटना क्रम ठाणे अंमलदार यांना सांगितला.
टायगर ग्रुपच्या माध्यमातून भैय्या थोरात यांनी टायगर ग्रुप धाराशिव जिल्हाअध्यक्ष पै. तुषार भाऊ शिंदे यांना संपर्क केला व त्यांना ह्या सदर व्यक्तीने सांगितलेली माहिती सांगितली व त्यांनी या व्यक्तीने सांगितलेल्या गावांमध्ये असलेले टायगर ग्रुप चे कार्यकर्ते त्यांच्याशी संपर्क साधून सदर व्यक्तीच्या घरी संपर्क साधला व ही व्यक्ती १० महिन्यापासून बेपत्ता असल्याची माहिती त्यांच्या घरच्यांनी सांगितली व त्याचबरोबर त्यांचे घरचे आम्ही त्यांना घेण्यासाठी येत आहोत कृपया त्यांना कुठे जाऊ देऊ नका असे सांगितले.
०२ मार्च दुपारी ३ वाजेच्या सुमारास मनोरुग्ण व्यक्तीची बहीण हिराबाई वाल्मीक झील व मेहुणे श्री.वाल्मीक झील आले व त्यांनी राहुरी पोलिस ठाण्यातून मारुती चंद्रभान जगताप ह्या व्यक्तीला आपल्या ताब्यात घेतले. त्यांनी टायगर ग्रुप व कार्यकर्त्यांचे खूप खूप मनस्वी आभार मानले व त्यांच्या डोळ्यांत आनंदाचे अश्रू आले.
या वेळी टायगर ग्रुपचे राहुरी तालुका प्रमुख भैय्या थोरात यांनी असे म्हंटले की महाराष्ट्रातील तरुणांना कळकळीची विनंती आहे की आपल्या जर असे काही व्यक्ती जर दिसले तर आपण त्यांना त्याच वेळी आधार द्यावा व आपल्या मुळे एखादा व्यक्ती त्याचे आयुष्य पुन्हा नव्याने जगू शकेल.राहुरी पोलिस प्रशासनाने दखल घेऊन ग्रुपला सहकार्य केल्या बद्दल त्यांचे टायगर ग्रुपच्या महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आभार मानले.
यावेळी टायगर ग्रुप चे कार्यकर्ते अनिकेत चव्हाण,संकेत ढुस, अथर्व कोरडे, तेजस कराळे,सय्यद राहील,यश शिंदे आदींनी परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत