राहुरी:-प्रतिनिधी आज राहुरी तालुक्याच्या दौऱ्यावर असताना खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी विविध गावांना भेटी दिल्या आणि विविध विकासकामांचे भ...
राहुरी:-प्रतिनिधी
आज राहुरी तालुक्याच्या दौऱ्यावर असताना खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी विविध गावांना भेटी दिल्या आणि विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण केले. त्यांच्या प्रयत्नांतून मार्गी लागलेल्या या कामांबाबत प्रत्येक गावांमधील नागरिकांनी त्यांचे आभार मानले.
यावेळी खासदार सुजय विखे पाटील यांनी बोलताना स्पष्ट केले की, विखे पाटील परिवार हा नेहमी सर्वसामान्य जनहिताची कामे करण्याचा प्रयत्न करत असतो. एखाद्याच्या सुखदुःखात नेहमीच असतो. तसेच प्रत्येक प्रश्नाची जाण व दिलेला शब्द पूर्ण करण्याची ताकद विखे पाटील परिवारामध्ये आहे. अनेक वर्षांपासून राहुरीचे राजकारण ज्या मुद्द्यावर चालले आहे, ते म्हणजे राहुरीचे ग्रामीण रुग्णालय आज अनेक वर्षांपासून रखडलेला प्रश्न मार्गी लागून आज त्या कामाचे भूमिपूजन होत आहे. आज ग्रामीण रुग्णालयाचे भूमिपूजन होत आहे याचा मला आनंद होत असल्याचे मत खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले. ग्रामीण रुग्णालय भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी राहुरी येथे ते बोलत होते.
जे लोक एखाद्या मुद्द्यावर प्रश्न विचारतात तेच लोक तोच मुद्दा जर एका लोकप्रतिनिधीने पूर्ण करून दिला तर त्याचा सत्कार देखील करत नाहीत. सध्याचे राजकारण हे प्लॅनिंग राजकारण चालू आहे. एखाद्या सभेत एखाद्याला प्रश्न विचारायला लावून समोरच्या लोकप्रतिनिधीची कशी पंचायत करता येईल, हेच सध्या काही राजकीय लोक करत असल्याचे परखड मत खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी मांडले. राजकारणामध्ये संवेदनशीलता, संयम कायम असणे गरजेचे आहे. आज या गतिमान सरकारमुळे राहुरी तालुक्यातील विविध प्रश्न मार्गी लागत आहेत आणि ही आपल्या जमेची बाजू आहे. अशीच कामे येथून पुढेही मार्गी लागतील असे आश्वासन सुजय विखेंनी उपस्थितांना दिले. यावेळी शिवाजीराव कर्डिले यांचे देखील समयोचीत भाषण संपन्न झाले.
दरम्यान 32 गावे अंतर्गत विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रमाच्या अनुषंगाने आज राहुरी तालुक्याच्या दौऱ्यावर असताना खासदार विखेंनी गुहा येथे चैतन्य ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, गुहा या नवीन कार्यालयाचे उद्घाटन केले. तसेच चिंचोली येथे ग्रामीण मार्ग 16 मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचे भूमिपूजन, कोल्हार खुर्द येथे रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचे लोकार्पण, चिंचोली येथे स्मशानभूमी विकास आणि रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण लोकार्पण, संक्रापुर येथे स्मशानभूमी विकास आणि रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण भूमिपूजन, दवणगाव येथे स्मशानभूमी विकास करण्याच्या कामाचे भूमिपूजन, आंबी येथे स्मशानभूमी विकास भूमिपूजन आणि रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचे लोकार्पण, केसापूर येथे स्मशानभूमी विकास कामाचे लोकार्पण आणि रस्ता मजबुतीकरण कामाचे भूमिपूजन खासदार डॉ. सुजय विखेंच्या हस्ते संपन्न झाले.
यासोबतच चांदेगाव येथे स्मशानभूमी विकास लोकार्पण तसेच स्मशानभूमी विकास आणि रस्ता मजबुतीकरण कामाचे भूमिपूजन, ब्राह्मणगाव भांड येथे स्मशानभूमी विकास लोकार्पण आणि रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचे भूमिपूजन, करजगाव येथे स्मशानभूमी विकास व जि. प. प्रा. शाळा भूमिपूजन, जातप/ त्रिंबकपूर येथे स्मशानभूमी विकास आणि रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचे भूमिपूजन, पाथरे खुर्द येथे रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचे भूमिपूजन, माहेगाव/ महाडुक सेंटर येथे स्मशानभूमी विकास आणि रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचे लोकार्पण तसेच रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचे भूमिपूजन देखील खासदार सुजय विखे यांच्या हस्ते संपन्न झाले.
विविध गावांमध्ये भेटी देऊन विविध कामांचे लोकार्पण व भूमिपूजन करण्याच्या अनुषंगाने खासदार विखेंनी वरील बऱ्याच ठिकाणी धावत्या भेटी दिल्या. दरम्यान अशीच निरनिराळी विकासकामे एक लोकप्रतिनिधी या नात्याने मार्गी लावण्यासाठी सदैव कटिबध्द भूमिका घेत राहील असे आश्वासन त्यांनी एका ठिकाणी बोलताना दिले. याप्रसंगी खासदार सदाशिव लोखंडे देखील उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत