राहुरी तालुक्यातील आठ शाळांना आ.सत्यजित तांबे यांच्या माध्यमातून संगणक संच उपलब्ध - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी तालुक्यातील आठ शाळांना आ.सत्यजित तांबे यांच्या माध्यमातून संगणक संच उपलब्ध

राहुरी(वेबटीम)  नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आ.सत्यजित तांबे यांच्या स्थानिक विकास निधीतून राहुरी तालुक्यातील  ८ शाळांना संगणक संच देण्यात आले. ...

राहुरी(वेबटीम)




 नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आ.सत्यजित तांबे यांच्या स्थानिक विकास निधीतून राहुरी तालुक्यातील  ८ शाळांना संगणक संच देण्यात आले. संगणक संच प्रदान कार्यक्रम राहुरी फॅक्टरी येथील शिवाजी प्राथमिक विद्यालयात संपन्न झाला.

 अत्याधुनिक शिक्षण ही काळाची गरज असून बालवयात विद्यार्थ्यांना संगणकाचे धडे मिळावे या हेतूने आ.सत्यजित तांबे यांच्या माध्यमातून राहुरी तालुक्यातील चिंचोली येथील कै.जनार्धन काळे विद्यालय, गुहा येथील लांबे-पठाण वस्तीवरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कोळसे वस्तीवरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वळण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, करजगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जोगेश्वरी आखाडा येथील नूतन मराठी शाळा, राहुरी फॅक्टरी येथील शिवाजी प्राथमिक विद्यालय व तांभेरे येथील संत महिपती विद्यालय आदी शाळांना संगणक संच देण्यात आले.


यावेळी काँग्रेसचे जिल्हा सचिव अजय खिलारी,  राजेंद्र बोरुडे, संतोष थोरात, नवनाथ बडे, दीपक ढुस, मुख्याध्यापिका आवारी मॅडम, श्री.लोखंडे सर, श्री.गोरे सर, श्री.इरुळे सर, विलास पवळ, पत्रकार गोविंद फुणगे, अमित देशमुख, उमेश खिलारी, राशीनकर सर, जाधव सर आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत