राहुरी(बाळकृष्ण वाघ) अखंड हिंदुस्थानाला एकता व मानवतेचा संदेश देणारे महान गुरू संत शिरोमणी रविदास महाराज यांची जयंती रविवार, दि.२५ फेब्रुव...
राहुरी(बाळकृष्ण वाघ)
अखंड हिंदुस्थानाला एकता व मानवतेचा संदेश देणारे महान गुरू संत शिरोमणी रविदास महाराज यांची जयंती रविवार, दि.२५ फेब्रुवारी २०२४ रोजी संत रोहिदास सेवा मंडळ व समस्त चर्मकार राहुरी तालुक्याच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली.
२५ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता आनंदऋषिजी उद्यान येथून पारंपारिक वाद्य ढोल ताशा व सनईच्या गजरात व फटाक्याच्या आतिषबाजीत गुरू रविदास महाराजांच्या प्रतिमेची गोकूळ कॉलनी, नवीपेठ, शनी चौक, छ.शिवाजी महाराज चौक, शुक्लेश्वर चौक, पृथ्वी कॉर्नर मार्गे पुन्हा आनंदऋषिजी उद्यान येथील कार्यक्रमस्थळी मिरवणूक निघणार आहे. तद्नंतर ११ ते १२ यावेळेत नागपूर येथील प्रसिद्ध व्याख्याते प्रा.डॉ.चंद्रशेखर चांदेकर यांचे प्रबोधनपर प्रवचन होऊन तद्नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे.
मिरवणूकीस राहुरी तालुक्यातील जास्तीत जास्त चर्मकार बांधवांसह सर्व समाजातील नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संत रोहिदास सेवा मंडळ राहुरी तालुक्याच्या वतीने करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत